CIBIL स्कोअर कसा वाढवायचा? अन् किती CIBIL स्कोअर असल्यावर मिळणार कर्ज? जाणून घ्या सविस्तर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL Score: आज काल पैशाची गरज कोणाला कुठे भासेल सांगता येत नाही. आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी तुम्हाला कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर आजकाल सर्वात महत्त्वाचा असतो ते म्हणजे CIBIL स्कोअर. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेतून सहजपणे कर्ज मिळून जाते. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर किती आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल तर त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

जेव्हा पण तुम्ही कार बाईक किंवा घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करतात त्यावेळी तुमचा CIBIL स्कोअर सर्वप्रथम तपासला जातो. सध्या बँकांचा नियम असा आहे की जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कोणत्याच बँकेकडून कर्ज दिले जात नाही. कर्ज मिळवण्यासाठी CIBIL स्कोअर हा प्रमुख पॅरामिटर ठरवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचा CIBIL स्कोअर 300 ते 900 दरम्यान असेल तर यावर त्याला कर्ज मिळणार का नाही हे निश्चित केले जाते. ज्या लोकांचा CIBIL स्कोअर 900 च्या जवळ असतो त्या लोकांना कुठेही कर्ज घेण्यास अडचण निर्माण होत नाही. त्याचबरोबर ज्या लोकांचा CIBIL स्कोअर 300 च्या जवळ किंवा 600 च्या खाली असेल त्यांना कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

हे पण वाचा| मोठी बातमी ! आधार कार्डबाबत हा नवीन नियम झाला लागू!

जर CIBIL स्कोअर खराब किंवा कमी असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतीच बँक कर्ज देणार नाही. अशावेळी CIBIL स्कोअर कसा वाढवायचा? यात कशी सुधारणा करायची? असा प्रश्न निर्माण होतो. तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे एखादे लोन पेंडिंग आहे का हे चेक करावे लागेल. जर तुम्ही यापूर्वी एखादे लोन घेऊन भरले नसेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या CIBIL स्कोअर वर होत असतो. त्यामुळे सर्वप्रथम जर असे एखादे कर्ज असेल तर ते भरून टाका.

त्यानंतर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचे बिल देखील वेळेत भरा. जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर एका वेळी एकापेक्षा जास्त कर्ज घेऊ नका. जेणेकरून तुम्ही कर्ज भरण्यास कमी पडणार नाहीत. त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या कर्जदाराला साक्षीदार होण्यास टाळा. जर तुम्ही एखाद्या कर्जदाराला साक्षीदार झालात आणि त्यानं वेळेत कर्ज फेडलं नाही तर त्याचा इफेक्ट तुमच्या CIBIL स्कोअर वर देखील होत असतो. CIBIL स्कोअर सुधरवण्यासाठी गोल्ड लोन केले तर अधिक फायदेशीर ठरते. यामुळे बँक तुम्हाला कर्ज देण्यास नाकार देखील देत नाही आणि बँकेचा विश्वास तुमच्यावर वाढतो. अशाप्रकारे तुम्ही तुमचा CIBIL Score काही प्रमाणात सुधारू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment