Cotton market price | महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे कापूस बाजार भाव बद्दल, राज्यामध्ये सध्या कापूस पिकाची वेचणी सुरू झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी या चा बाजार खुले झालेले आहेत. बाजारामध्ये नवीन कापसाची आवक सुरू होण्यापूर्वी कापसाला काय दर मिळतात याची अपडेट आपल्या हाती आली असून जाणून घेऊया सविस्तर माहिती. Cotton market price
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मते कापूस हे त्यांच्यासाठी पांढर सोन आहे, खऱ्या सोन्याला तर भाव मिळतोय, पण शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून हे पांढरा सोनं पिकवला आहे त्याला काही वर्षांपासून कवडीमोल दर मिळत आहे. शेतकऱ्यांमधून पांढरा सोन्याला केलेला खर्चही निघत नसल्याची खदखद व्यक्त केली जात आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी केली. मराठवाड्यात तर काही उरलं नाही पूर्ण पीकच व्हायला गेला आहे.
राज्यातील भद्रावती, सावनेर, किनवट, वरोरा, अमरावती, यवतमाळ अशा प्रमुख बाजारात आज कापसाचे जोरदार आवक झाली आहे. भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाला चांगल्या प्रतीच्या आणि कोरड्या कापसाला मागणी वाढली. इथे दर 6900 ते 7000 रुपयांच्या आसपास मिळाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आवक वाढली असली तरी दर स्थिर आहेत. मात्र शेतकरी म्हणतात खतमजुरी आणि वाहतुकीचा खर्च वाढल्या आहेत आणि भाव तोच राहिला आहे हातात काही उरत आहेत.
तसेच किनवट बाजार समितीमध्ये सारखीच परिस्थिती पाहायला मिळते सरासरी सहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे. शेतकरी सांगतात की यंदा हवामानाने बराच खेळ केला आहे काही भागात पावसामुळे कापसात ओलावा राहिला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. तरी चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला चांगला दर मिळतो एक दिलासा एक चित्र आहे.
परंतु सध्या उरवरा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण पाहायला मिळालं. इथे आलेला 129 क्विंटल पैकी ओला आणि लोकल पतीच्या कापसाला फक्त 2000 ते 3750 रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळाला आहे. आणि शेतकरी बाजारात आले तेव्हा त्यांना वाटलं की भाव वाढेल परंतु हे दर ऐकून निराशा निर्माण झाली. एका शेतकऱ्याला सांगितलं आम्ही काबाडकष्ट केलं घामगाळला परंतु योग्य भावना मिळाल्याने आता आम्ही काय करावे.
सध्या बाजारामध्ये कापसाला योग्य दर मिळत नाही परंतु भविष्यामध्ये कापसाचे दर वाढणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे अद्याप कापसाची वेचणी सुरू आहे आणि कापूस बाजारामध्ये आलेला नाही ज्यावेळेस कापसाची आवक वाढेल त्यावेळेस भाव काय राहतात हे पाहण्यासारखे राहणार आहे.
