Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर आता राज्यामध्ये कापूस हंगाम सुरू होणार आहे. आता काही राज्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली आहे. तर काही कापूस खरेदी केंद्र दसऱ्यानंतर सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना किती दर मिळतो हे देखील जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी कापसाला 15000 रुपये दर द्या अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.Cotton Rate
तुम्हाला तर माहीतच आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. गुजरात प्रमाणे आपल्या राज्यात पण कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश या भागामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावरती अवलंबून आहे. गेल्या वर्षी या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला होता.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या पिकांनी खूप रडवले होते. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हातबल झाला होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना बाजारामध्ये अपेक्षित असा दर मिळाला नव्हता. परंतु शेतकऱ्यांनी याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाची लागवड केलेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना किती दर मिळतो हे देखील शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे.
कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपये दर मिळावा तसेच फळ पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तत्काळ मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या मार्फत करण्यात आलेली आहे. विविध मागण्यांचे निवेदन प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आलेले असून या निवेदनात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे.
आता लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. या खरेदी केंद्रावर सुरुवातीला कापसाला काय दर मिळतो. हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. का शेतकऱ्यांना यावर्षीही कापूस रडवणार शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणे गरजेचे आहे.
1 thought on “Cotton Market: कापसाला 15 हजार रुपये दर, शेतकऱ्याची मागणी जोर धरू लागली”