Edible Oil : राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आपल्याला दररोज उपयोगी पडणारे खाद्य तेलाचे दर वाढतच चाललेले आहेत. सध्या आयात शुल्कवाडी चा परिणाम खाद्यतेलावर दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया नवीन दर. Edible Oil
राज्यामध्ये सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या महागाईच्या जळा सहन करावा लागत आहेत. सोने चांदीचे दर ही कमालीचे वाढलेले आहेत नागरिकांना यामध्ये मोठा महागाईच्या झळा सहन करावा लागत आहेत. आता एक ऑक्टोबर पासून सिलेंडरचे दर देखील वाढल्यामुळे नागरिकांची मोठी आर्थिक कोंडी होताना दिसत आहे.
राज्यामध्ये आता पितृपक्ष सुरू आहे. बाजारात ग्राहक कमी असलेले तरी उत्सव चांगला आहे. बहुतांश वस्तुमालाच्या दरामध्ये तेजी आलेली असून खोबरे, खोबऱ्याची तेल, तसेच सोने चांदीचे दर देखील कमालीचे वाढलेले आहेत.
सणासुदीचे दिवस लक्षात घेता केंद्र सरकारने या महिन्यांमध्ये साखरेचा कोटा 25 लाख 50 हजार टन जाहीर केलेला आहे. मात्र, असे असले तरी साखरेच्या दरात तेजी कायम आहे. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका देखील बसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये नारळाची आवक ही दक्षिण भारतातील कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून होत असते. आवक कमी झाल्याने भाव अचानक वाढलेले आहेत. सध्या बाजारातील नारळाचे दर 2500 ते 3000 रुपये शेकडापर्यंत पोहोचले आहेत.
आयात शुल्कात वाढ
सरकारने आयात शुल्क 20 टक्के इतके. वाढवल्यामुळे सर्व खाद्यतेलांच्या दरामध्ये कुंटल मागं 1000 ते 2000 रुपयांची तेजी आलेले आहे. सध्या पाम तेल सोयाबीन तेल सरकी तेल प्रत्येकी 13400 सूर्यफूल तेल तेरा हजार पाचशे आणि करडीचे तेल 21,500 रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
खाद्यतेलाचे 15 लिटर डब्याचे दर
- सूर्यफुल -1700 आधी – 1970 आता
- सोयाबिन – 1690 – आधी – 1980 आता