Fake Tiger and Real Tiger Viral Video: आजकाल सोशल मीडियावर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही चित्र विचित्र धक्कादायक किंवा हसवणारी गोष्ट घडली तर ती नक्कीच व्हायरल होते. असाच एक अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस वाघाचा कातड पांघरून थेट जंगलातील राजाच्या म्हणजे खऱ्या वाघाच्या समोर उभा राहतो आणि पुढे जे घडते ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
हा संपूर्ण थरारक प्रकार पाहता क्षणी हा माणूस वाचन का असा प्रश्न निर्माण होतो. व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक माणूस डोक्यापासून पायापर्यंत वाघाचं कातड पांघरून जंगलाच्या राजासमोर जातो. पुढे दोन वाघ येतात आणि शांतपणे बसतात. त्यातील एक त्या व्यक्तीच्या अवतीभवती फिरत असतो. नकली वाहक म्हणजे तो व्यक्ती त्या वाघांच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. सुरुवातीला खरा वाघ थोडा गोंधळात पडतो. मात्र काही क्षणातच तो नकली वाघाच्या समोर उभा राहतो. त्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन वास घेतो आणि पुढच्या क्षणी अचानक जोरदार पंजा मारतो. त्याच्या त्या हमल्याने नकली वाघाच्या चेहऱ्यावरील मास खाली पडते आणि सर्व रहस्य समोर येते. रियल वाघ क्षणभर मागे सरकतो आणि नकली वाघाचे वेशांतर केलेला माणूस धावत सुटतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओच्या शेवटी जो प्रकार दिसत आहे त्यावरून एक गोष्ट कळते ती म्हणजे खरा वाघ आणि त्याची भीती खूप भयंकर आहे. तो माणूस आपला जीव वाचवण्यासाठी वळतो आणि खरा वाघ त्याच्यामागे धावत आहे. हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी ही मूर्खपणाची लक्षणे आहेत असं म्हटलं आहे तर काही जणांनी अरे बापरे एवढं धैर्य कुठून आलं यांच्यात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे वाघ हा केवळ बलवानच नाही तर प्रचंड हुशार आणि जागरूक प्राणी आहे.
अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वाघाचे क्षेत्र म्हणजे जंगलाचं राज्य अशा कमेंट देखीकेल्या आहेत. काही जणांनी तर त्या नकली वाघाच्या पोशाखाली असलेला माणूस जिवंत कसा वाचला हेच त्याचं नशीब असं म्हटलं आहे. आशा व्हिडिओ मुळे लोकांचं मनोरंजन होतं हे जरी नक्की असलं तरी आपण त्यातून एक गंभीर संदेश देखील मिळवू शकतो. जंगलात जाणं वन्य प्राण्यांच्या जवळ जाणं हे केवळ सहज नसून तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. Fake Tiger and Real Tiger Viral Video