Farmer ID तयार करा नाहीतर मिळणार नाही Pm Kisan योजनेचा 19वा हप्ता? वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer ID: भारत सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पीएम किसन सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही फार्मर आयडी तयार केली नाही, तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा नवीन नियम शेतकऱ्यांसाठी खूपच कडक असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करणे खूप गरजेचे आहे. कशाप्रकारे फार्मर आयडी तयार करू शकता व काय आहे योजना आपण जाणून घेऊया. Farmer ID

फार्मर आयडी कसे बनवावे ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. आता जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ऍग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार क्रमांक जोडण्याची आणि शेतकरी (Farmer ID) ओळख क्रमांक प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

पीएम किसन योजनेचा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असणार आहे. त्यासोबत शेतकरी ओळख क्रमांक जोडणी अनिवार्य असणार आहे. शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी जवळच्या CSC ( Common Service Center) केंद्रावर जाऊन नोंदणी करा.

19 वा हप्ता कधी होणार वितरित?

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक लागू होणार नाही. परंतु 20 व्या हप्त्यापासून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात येणार आहे. नवीन नोंदणीसाठी पती-पत्नी व अठरा वर्षाखालील कुटुंबातील सदस्यांच्या आधार क्रमांक अनिवार्य असणार आहे. जर शेतकऱ्यांनी या नियमाचे पालन केले नाही, तर त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.

शेतकऱ्यांची संख्या आणि इ केवायसी स्थिती:

सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 96.67 लाख लाभार्थी नोंदणीकृत आहेत. तसेच त्यापैकी 95.95 लाख लाभार्थींची नोंदणी जमिनीच्या नोंदणी नुसार पूर्ण झालेली आहे. मात्र अद्याप 78 हजार लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीची नोंदणी अद्यावत केलेली. त्यामुळे पुढचा आता त्यांना मिळू शकणार नाही हे देखील जाणून घेणे खूप गरजेचे आहे. याशिवाय 95.16 मग शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु 1.89 लाख शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

बँकेची स्थिती :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 94.55 लाख लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांना आधार जोडलेले आहे. मात्र 1.98 लाख शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर वेळेत संपूर्ण गोष्टी पूर्ण केल्यास, त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment