Gold Loan: अचानक कधी पैशाची गरज भासली तर अशावेळी अनेक जण मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे मदत मागतात. मात्र आजच्या काळात सुरक्षित व सोपा पर्याय म्हणजे गोल्ड लोन आपल्या घरात असलेले सोन हे फक्त दागिने म्हणून वापरायचं नसून गरजेच्या वेळी ते आपल्याला आर्थिक पाठबळ देखील देऊ शकते. प्रत्येक कुटुंबात थोडं फार सोनं खरेदी केलेला असतंच. त्या सोन्याचा योग्य वापर करून तुम्हाला जेव्हा पैशाची आवश्यकता असेल त्यावेळेस तुम्ही गोल्ड लोन करू शकतात. सोन्याच्या आधारावर आपण सहजपणे कोणत्याही बँकेत कर्ज घेऊ शकतो त्याचबरोबर त्यावर व्याजदर देखील फार कमी असतो. पर्सनल लोन च्या तुलनेत गोल्ड लोणचं व्याजदर खूपच कमी असतो. चला तर मग जाणून घेऊया सध्या देशातील कोणती प्रमुख बँक कमी व्याजदराने गोल्ड लोन देत आहे.
- पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक ही सरकारी बँक असल्यामुळे ग्राहकांना फक्त 8.35% वार्षिक व्याजदरावर गोल्ड लोन दिले जाते. ज्यांना अति आवश्यक कमी व्याजदरात कर्ज हवे आहे त्यांच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेत गोल्ड लोन उत्तम पर्याय ठरू शकतो.
- इंडियन बँक
इंडियन बँक आपल्या ग्राहकांना 8.75% वार्षिक व्याजदरावर गोल्ड लोन देते. ही देखील सरकारी बँक असल्यामुळे ग्राहकांचा यावर पूर्णपणे विश्वास आहे. या बँकेमध्ये देखील तुम्ही अगदी कमी व्याजदरात गोल्ड लोन करून तुमची तात्पुरती गरज भागवू शकतात.
- आयसीआयसीआय बँक (ICICI BANK)
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक. या बँकेत सुद्धा आपल्या ग्राहकांना 8.75 टक्के व्याजदराने सुवर्ण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या बँकेतून देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गोड लोणचे प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकता.
- कॅनरा बँक
कॅनरा बँक देखील गोड लोन साठी सुप्रसिद्ध आहे. या बँकेकडून गोल्ड लोन साठी ग्राहकांकडून 8.95% व्याजदर आकारला जातो. ग्रामीण भागात या बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी व मध्यमवर्गीय लोक या बँकेतूनच गोल्ड लोन घेण्यास प्राधान्य देतात.
- कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 9.00% व्याजदराने सुवर्ण कर्ज देते. या बँकेला डिजिटल माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा असल्यामुळे कर्जाचे मंजुरी आणि प्रक्रिया खूपच जलद गतीने होते. त्यामुळे अचानक पैशाची गरज भासल्यास अनेक नागरिक या बँकेत गोल्ड लोन करण्यास प्राधान्य देतात. Gold Loan
- एचडीएफसी बँक (HDFC BANK)
एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक बँक आहे. ही बँक गोल्ड लोन वर 9.30% व्याजदर आकारते. या बँकेत कर्जाची रक्कम वाढवून दिले जाते त्याचबरोबर परतफेडीची मुदत देखील अधिक असल्यामुळे अनेक ग्राहक या बँकेकडे गोल्ड लोन करण्यासाठी आकर्षित होतात.
गोल्ड लोणचे काय फायदे आहेत?
- जर तुम्हाला अचानक पैशाची आवश्यकता भासल्यास त्वरित कर्ज मंजूर होते. त्याचबरोबर कमी कागदपत्र आणि प्रक्रिया जलद होते.
- पर्सनल लोन च्या तुलनेत गोल्ड लोन मध्ये कमी व्याजदर असल्यामुळे ग्राहकांना हेलोन परवडते.
- गोल्ड लोन केल्यानंतर तुमचं सुरक्षितपणे बँकेत राहते चोरीचा धोका निर्माण होत नाही. आणि तुमची तात्पुरती गरज देखील भागते.
- गोल्ड लोन तुम्ही EMI द्वारे देखील भरू शकता किंवा तुम्हाला एकरकमी परतफेड करायची असेल तर ती देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
सोनं हे फक्त दागिने म्हणून खरेदी केलं जातं असं नाही. यामध्ये गुंतवणूक म्हणून देखील अनेक जण सोने खरेदी करतात. खरेदी केलेले सोनं मोडणे ऐवजी बँकेत गोल्ड लोन करून तुमची तात्पुरती गरज भागली तर तुम्ही पुन्हा तुमचं सोनं सोडून आणू शकता. त्याचबरोबर घरातलं सोनं बँकेत ठेवल्यानंतर सुरक्षिता मिळते. मात्र कोणताही कर्ज घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या गरजेनुसार योग्य बँक निवडा. आम्ही दिलेली माहिती ही सर्वसामान्यांसाठी आहे. कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.