GOLD RATE | सोन्याच्या भावात दिवाळीपूर्वी होणार मोठा बदल; दर वाढणार की कमी होणार वाचा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GOLD RATE | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे, मध्यंतरी थोडी घसरण झाली परंतु आता पुन्हा दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. दररोज सकाळी दर वाढतात आणि संध्याकाळपर्यंत ते आकाशाला भिडतात. सर्वसामान्य नागरिक सध्या फक्त बाजाराकडे बघतोय सोन खरेदी करण्याचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे. सोन खरेदी करणं त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल आहे. आता सोने खरेदी करणे म्हणजे खिसा मोकळा होणे असे देखील म्हटले जात आहे. तर सध्या सणासुदीचा काळ आलेला आहे, त्याच वेळी सोन्य घेणं आपल्या संस्कृतीचा एक भाग असतो. पहिल्यांदाच परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे. सोन्याचे दर वाढलेले आहेत आणि सामान्य नागरिकांना हे खरेदी करणे परडवायचं नाही. GOLD RATE

गेल्या वर्षभरामध्ये सोन्याचा भाव थेट 44% ने वाढला आहे. म्हणजेच, गेले दिवाळीत ज्यांनी थोडं सोनं घेतलं होतं, ज्यांची आज ती गुंतवणूक जवळपास अर्ध्यांनी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात तर सोन्याच्या भावाने तब्बल दहा टक्क्यांची झेप घेतली. आणि आता ऑक्टोबर सुरू होताच पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागच्या पाच वर्षाचा हिशोब पाहिला तर…

मागच्या पाच वर्षाचा हिशोब पाहिला तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत. कारण मागच्या पाच ते सहा वर्षाचा आकडा पडला तर दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सोन्याचा भाव वाढलेला पाहायला मिळतो. सरासरी पाहिलं तर सप्टेंबर मध्ये 2.57 टक्क्यांनी सोनं वाढतं आणि नंतर ऑक्टोबर मध्ये आणखी काहीशी रुपयांची उडी येते. याच काळात परदेशी बाजारातही डॉलर आणि जागतिक सोन्याचे दर चढउतार घेत आहेत. त्याचाही परिणाम आपल्या बाजारावर होतो.

सराफ दुकानदारांचं काय म्हणणं?

सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे सोन्याची. सोन्याचा भाव आज इतक्या रुपयांनी वाढला, इतक्या रुपयांनी कमी झाला इतक्या रुपयांनी आता वाढला आहे. आपल्याला काय खरेदी करणे सोप्प नाही. सध्या सणासुदीचा काळ आहे आणि मागणी वाढते आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले आहेत काही तज्ञ सांगतात की 30 ऑक्टोबर पर्यंत सोन्याचा दर प्रति 10 ग्राम एक लाख रुपयांच्या घरामध्ये पोहोचू शकतो.

चांदी ही मागे नाही

फक्त सोन्याच्या दरातच वाढ नाही, तर चांदीच्या भावात देखील जोरदार वाढ झालेली आहे. दोन दिवसात तब्बल चांदीचा दर 15000 रुपयांनी वाढला आहे. सराफ बाजारात चांदीचा दर एक लाख 76 हजार प्रति किलो पर्यंत पोहोचले तर सांगितलं जातय. म्हणजेच, जेव्हा सोनू वाढतो तेव्हा चांदी देखील मागे राहत नाही पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे.

भविष्यात देखील आता सोन चांदीचे दर का राहतात याकडे पाहण्यासारखे राहणार आहे सध्या सणासुदीचा दिवस आहे यामुळे मागणी वाढत आहे. दिवाळीनंतर सोन्याचे काय दर राहतात हे पाहण्यासारखे असणार आहे.

हे पण वाचा | आज सोने खरेदी करायचा आहे ? जाणून घ्या  1 तोळा सोन्याचा दर किती 

Leave a Comment