Gold Rate Prediction | भारतात सोनं म्हटलं की नुसतं धातू नव्ह एक हिंदू धर्माची संस्कृती, परंपरा आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात प्रत्येक घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं. धनत्रयोदशी असो किंवा दिवाळी, सोन्याच्या छोटा दागिना घरी आणला म्हणजे शुभ मानले जातात. पण यावर्षी सोन्याच्या भावाने जी झेप घेतली आहे, त्यामुळे सामान्य खरेदीदार चिंतेत आहेत. अगदी रोजंदारींवर काम करणारा मजूर असो की शेतकरी किंवा मध्यवर्गीय, प्रत्येकाला प्रश्न पडत आहे की, दिवाळीपर्यंत सोन स्वस्त होणार का? Gold Rate Prediction
केडिया कॅपिटल चे संस्थापक अजय केडिया यांचं म्हणणं आहे की गेल्या एका वर्षांमध्ये सोनं चांदी दोघांनी तब्बल 50 % हून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच या दोन्ही धातूंनी गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवून दिला आहे. पण या सातत्याने वाढलेल्या भावामुळे आता सोन ओव्हर व्हॅल्यू झाल आहे. त्यामुळे पुढील तीन-चार महिन्यात थोडीशी घसरण दिसू शकते. 26 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सराफ बाजारात 24 कॅरेट सोन तब्बल एक लाख 16 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचलं होतं.
तज्ञ म्हणतात की सोन्यात खरी मोठी तेजी तेव्हाच येईल जेव्हा जागतिक परिस्थिती पुन्हा अस्थिर होईल. मग ते रशिया युक्रेन युद्ध असो, भारत पाकिस्तान तणाव असो किंवा अमेरिका भारत व्यापार तणाव असो. अशावेळी शेअर बाजारातून पैसे काढून गुंतवणूकदार नेहमी सोन्याकडेच धाव घेतात.
सोन्या सोबतच चांदीचे दर वाढत आहेत. 16 सप्टेंबर रोजी एक किलो चांदीची किंमत 141,700 रुपये इतकी नोंदली गेली. पण सोन्याच्या तुलनेत चांदीत मोठी घसरण होण्याची शक्यता नाही, असं तज्ञांचे म्हणणं आहे. कारण चांदीची मागणी दिवसेंद दिवस वाढत आहे, विशेषता इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा, औद्योगिक व्यापार या क्षेत्रात चांदीचे महत्त्व वाढल आहे. उत्पादनात वाढ झालेली नाही, त्यामुळे डिमांड जास्त आणि सप्लाय कमी या हिशोबाने चांदीचे भाव टिकून राहणारच आहेत.
दिवाळी हंगाम सुरू झालेला आहे, आणि लोक खरेदीसाठी बाजारात गर्दी करतील हे नक्की. पण तज्ञ सांगतात की सोन अजूनही घाई घाईने विकत घेणं शहाणपणाचा नाही. पुढच्या काही महिन्यात थोडं स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर चांदीचं काय तर तिचा भाव खाली येणे ऐवजी स्थिर किंवा किंचित जास्त राहील. म्हणून गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओत चांदीला नक्कीच जागा द्यावी लागणार.