दिवाळी आधीच आनंदाची बातमी! सोन्याचे दर तब्बल 4,000 रुपयांनी घसरले,जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात आणि नवीन खरेदी उत्सवात साजरा केला जातो. या सणानिमित्त अनेक जण नवीन दागिने खरेदी करतात. मात्र यावेळी दरवाढीमुळे अनेक जणांनी दागिने खरेदी करण्याचे टाळले होते. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीचे दर अक्षरशः गगनाला भेटले होते. पण आज बाजारातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जे लोक दिवाळीनिमित्त दागिने खरेदी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

गेल्या महिन्याभरात सतत वाढ होत असल्यामुळे दर घसरताना दिसलेच नाहीत. मात्र आज सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल 4000 रुपयांनी घसरला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील प्रति किलो मागे 22 ते 23 हजार रुपयांची घसरण झाली आहे. शनिवारी सकाळी सोन्याचा दर 1,31,000 रुपये इतका झाला आहे. जो शुक्रवारी 1,34,000 रूपये पोहचला होता. चांदीचा दर प्रतिकिलो 1,90,000 रुपयांवरून थेट 1,68,000 रुपयापर्यंत घसरला आहे. Gold Rate Today

ही घसरण पाहून सोनार गल्लीत पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद खुलला आहे. अनेक दिवसापासून ग्राहक सोन्याचे दर वाढल्यामुळे खरेदी करणे टाळत असल्यामुळे दिवाळी सारख्या सणानिमित्त देखील दुकान पूर्णपणे रिकामी दिसत होती. मात्र अचानक सोन्याच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे सोनाराच्या दुकानांमध्ये पुन्हा गर्दी वाढली आहे. विशेषतः ग्रामीण भागातून अनेक जण सोन्या-चांदीचे खरेदी करण्यासाठी जवळील सोन्याच्या दुकानात दाखल होत आहेत.

सोने बाजार भाव तज्ञ सांगतात की, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामध्ये झालेल्या बदलामुळे भारतातील दर घसरले आहेत. डॉलरची स्थिती, मध्यपूर्वेतील तणाव कमी होणे आणि गुंतवणूकदारांचा कल पुन्हा शेअर मार्केटकडे वाढल्यामुळे सोन्या चांदीची मागणी थोड्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारभावावर होताना दिसत आहे. एक महिना मागे पाहिलं तर सोन्याचा दर प्रति तोळा 90000 च्या आसपास होता. मात्र गेल्या काही आठवड्यापासून सोन्याच्या भावाने झपाट्याने वाढ घेतली आणि 1,31,000 रुपयांचा पल्ला गाठला. सोना आता सर्वसामान्यांसाठी परवडणार राहिलं नाही. असं अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र आता दिवाळीनिमित्त सोन्याचे किमतीत झालेल्या या थोड्या का होईना घसरणीमुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

भाऊबीज निमित्त दर आणखीन घसरतील का?

सराफ बाजारात अशी चर्चा रंगत आहे की, दिवाळी झाल्यानंतर भाऊबीजेच्या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. कारण सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा मजबूत होत आहे आणि आयात खर्चात घट होत असल्यामुळे सणानंतर सोन्याचे दर काही प्रमाणात घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तज्ञ सांगतात की, ही घसरण दीर्घकाळ टिकणार नाही. कारण जागतिक परिस्थितीत अजूनही अनिश्चितता कायम आहे त्यामुळे पुढील काही आठवड्यात पुन्हा सोन्याची किंमत वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हाच योग्य काळ ठरू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment