Gold Rate Today | पुणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याची चर्चा जोरात होती. दिवसभरात दुकाने उघडताच ग्राहकांच्या चेहऱ्यावर हलकीशी चमक दिसली कारण गेल्या काही दिवसांत आकाशाला भिडलेले दर आज अचानक थंडावले. Gold Rate Today
सोने नेहमीच सामान्य माणसाच्या स्वप्नातलं दागिनं. लग्न असो, सण असो किंवा छोटं मोठं गुंतवणूक सोनं घेताना दर पाहूनच लोक हात पुढे करतात. पण आजचा दिवस पुणे-मुंबई परिसरातील लोकांसाठी थोडासा दिलासा घेऊन आला.
२४ कॅरेट सोनं थेट खाली !
IBJA च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर १,२६,५५४ वरून एकदम घसरत १,२४,७९४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आला. म्हणजे प्रति ग्रॅम जवळपास १,२०० रुपयांची सरळ घसरण !
२२ कॅरेट सोनंही खाली आलं १,१५,९२३ वरून १,१४,३११ वर. तर १८ कॅरेटचे दागिने घेणाऱ्यांसाठी किंमत ९४,९१६ वरून ९३,५९६ वर आली आहे.
चांदीच्या दरातही मोठी गडगड. प्रति किलो तब्बल ३,३६३ रुपयांनी किंमत खाली येऊन १,५९,३६७ रुपये इतकी स्थिरावली.
पुण्यात सोन्याचं वातावरण आज अगदी शांत-थंड होतं.
24 कॅरेट : ₹12,703/gr
22 कॅरेट : ₹11,644/gr
18 कॅरेट : ₹9,527/gr
पुण्यातील सराफा दुकाने आज अधिकच गजबजलेली दिसली. लोक म्हणत होते. काय माहित उद्या पुन्हा उडेल, आजच घेऊ या.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदी घसरलं आणि त्याचा थेट परिणाम भारतात ! COMEX वर सोन्याचा दर 3.15% घसरला, चांदी जवळपास 5% खाली आली. MCX वरही दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण नोंदली गेली.
मुंबई-जे देशाचं सोन्याचं मुख्य मार्केट इथेही आज त्याच स्वरूपाची घसरण दिसली. २४ कॅरेटचा दर स्थिर, पण खाली. खरेदीदारांची गर्दीही वाढलेली दिसली.
संभाजीनगरमध्ये काय दृश्य ?
संभाजीनगरमध्ये सोन्याच्या शुद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही दुकानांत आज ग्राहकांची चांगली वर्दळ. येथे दरः
24 कॅरेट : ₹12,703/gr
22 कॅरेट : ₹11,644/gr
18 कॅरेट : ₹9,527/gr
स्थानिक ज्वेलर्स सांगत होते दोन-तीन दिवस बाजार शांत राहिला तर भाव आणखी कमी होऊ शकतात.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि योग दर जाणून घेण्यासाठी आपल्याला सराफ दुकानाशी संपर्क साधा.)