Gold Rate Today: भाऊबीज नंतर आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या काळामध्ये काही दिवस सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमती गगनाला भिडताना दिसत आहेत. आज 24 ऑक्टोबर 2025 रोजी सोन्याच्या किमती प्रति तोळा तब्बल 380 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरची मजबूत हालचालीमुळे सोन्याचे भाव वाढत होते. मात्र दिवाळी दरम्यान सोन्याच्या किमतीत चांगली घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याची किंमत वाढत्या दिशेने सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात लग्न समारंभ मुहूर्त दागिने खरेदीची लगबग यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजीत आले आहेत.
दिवाळीच्या सणात सोन्याच्या किमती स्वस्त झाल्या आहेत भाऊबीजेला सोनं खरेदी करू असा विचार केला होता पण भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्याची किंमत वाढताच ग्राहक पुन्हा खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. आपण आज या लेखांमध्ये सोन्याची नवीन किंमत काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही देखील नवीन सोने खरेदी करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
24 कॅरेट सोन्याचा दर (24k Gold Price Today)
आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दरामध्ये 380 रुपयाची वाढ झाली आहे. मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद सारख्या प्रमुख बाजारात एक तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,460 रुपये पर्यंत पोहोचला आहे. आठ ग्रॅम सोन्याचा दर 1,00,364 एवढा आहे तर 10 तोळ्यासाठी तब्बल 3,800 रुपये वाढवून द्यावे लागत आहेत. Gold Rate Today
हे पण वाचा| १ नोव्हेंबरपासून बँकेच्या नियमात मोठा बदल होणार! जाणून घ्या सरकारने कोणता निर्णय घेतला?
22 कॅरेट सोन्याचा दर (22k Gold Price Today)
24 कॅरेट सोन्यासोबत 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. प्रति तोळा 22 कॅरेट सोनं आता 1,15,000 रुपयांच्या वर पोहोचले आहे. आठ ग्रॅम सोन्याचा दर 92,000 तर 10 तोळ्यासाठी तब्बल 3500 रुपये जास्त द्यावे लागत आहेत. महिलांसाठी दागिने बनवण्यासाठी जास्त वापरला जाणारे हे 22 कॅरेट सोने आता सर्वसामान्य खिशाला मोठा फटका बसवणार आहे.
18 कॅरेट सोन्याचा दर (18k Gold Price Today)
18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील आज मोठी वाढ झाली आहे. तुम्ही देखील हलक्या सोन्याचे खरेदी करू इच्छित असाल तर 18 कॅरेट सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज 18 कॅरेट सोनं प्रति तोळा 94,090 रुपये एवढे झाले असून यात 280 रुपयाची वाढ झाली आहे. आठ ग्रॅम सोनं 75 हजार 272 तर दहा तोळा सोनं खरेदी करण्यासाठी जवळपास 9,40,000 रुपये द्यावे लागत आहेत.
सोन्याचे दर का वाढत आहे?
वारंवार सोन्याचे दर का वाढत आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील ताणलेले आर्थिक संबंध, डॉलर मध्ये झालेला चढ उतार आणि गुंतवणूकदाराकडून सोन्याला दिले जाणारे प्राधान्य या प्रमुख कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. भारतामध्ये सणासुदीच्या हंगाम सुरू झाल्यानंतर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्याचबरोबर लग्नसरामध्ये देखील सोन्याची किंमत आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे.
