Havaman Andaj : खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये अचानक बदल झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंतेमध्ये देखील वाढ झालेली आहे. तर अनेक भागांमध्ये पावसाचे थैमान देखील पाहायला मिळाले आहे. मध्यंतरी मराठवाड्यामध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके वायला गेलेले आहे. तर काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. Havaman Andaj
हवामान अंदाज आणि शेती विषयक बातमी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आता आपल्याकडे गणेश उत्सव सुरू झालेला आहे. या गणेशोत्सवामध्ये देखील भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली तर भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज
खरंतर आपल्याकडे लाडक्या बाप्पाच्या आगमन हे थाटामाटात होत असते याचा आगमनाला पावसाने देखील हजेरी लावलेली आहे परंतु ही हजेरी अति मुसळधार पावसात बदलणार आहे भारतीय हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जरी केलेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे आणि ठिकाणी राज्याचे हवामान बिघडल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे आणि ठिकाणी राज्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे
एक आणि दोन सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये खूप मोठा पाऊस झाला यामुळे खरीप हंगामातील पिकांचे अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे हा पाऊस कधी विश्रांती करतो अशी शेतकऱ्यांना वाटू लागलेले होते.
बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाने विश्रांती घेतली परंतु आता पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे राज्याचा हवामान बदल पाहायला मिळत आहे भारतीय हवामान खात्याने 9 सप्टेंबर पासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या जिल्ह्यामध्ये बरसणार मुसळधार पाऊस.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 8 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
तसेच विदर्भामध्ये आज येलो अलर्ट देखील देण्यात आलेला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच 9 सप्टेंबर रोजी पुण्यासह सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा अमरावती गडचिरोली बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला या 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
1 thought on “महाराष्ट्राचे हवामान बिघडलं, या जिल्ह्यामध्ये पडणार अतिवृष्टी सारखा पाऊस, नवीन अंदाज जाणून घ्या”