IB ACIO -II/Tech 2025 Application Form | तरुणांसाठी आनंदाची बातमी! चांगली नोकरी शोधत आहात, देशाच्या सुरक्षेच काम करायचा आहे. तर ही बातमी नक्कीच कामाची ठरणार आहे. कारण इंटेलिजन्स ब्युरो (IB) या केंद्रीय गुप्तचर खात्यामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. गृहमंतलयाच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO-II/ TECH) या पदासाठी पगार तब्बल दीड लाख रुपये पर्यंत मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे, 11 नोव्हेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी लिंक आणि सर्व माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (maha.gov.in) उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी फक्त तेच उमेदवार पात्र ठरणार आहे ज्यांनी GATE 2023,2024 किंवा 2025 मध्ये पात्रतेचे गुण मिळवले आहेत. विशेषता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या शाखेत GATE उत्तीर्ण झालेल्यांना या भरतीत प्राधान्य देण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी पूर्ण केलेली असावी. IB ACIO -II/Tech 2025 Application Form
भरती बाबतचे महत्त्वाचे तपशील
या भरती अंतर्गत 258 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची प्रक्रिया गृह मंत्रालय (MHA) यांच्या देखरेख खाली पार पडणार आहे. उमेदवारीची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन मिळणार आहे. यासोबतच केंद्रीय सरकारच्या नियमाप्रमाणे भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळणार आहेत. भरतीची अधिसूचना आधीच रोजगार वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून लवकर परीक्षेची तारीख देखील जाहीर केली जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून अर्ज करायचा आहे अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि आवश्यक अपलोड करा.
