IMD Weather Alert | अरबी समुद्रापासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्रावरती पावसाचे संकट निर्माण झाले आहे, याच पार्श्वभूमी वरती पुढची 48 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. गुजरातच्या किनाऱ्यावरून सरकणारा कमी दाबाचा पट्टा हा आता महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. तर दुसरीकडे आंध्रप्रदेशच्या किनारी सुद्धा असा पट्टा तयार झालेला आहे. दोन वेगवेगळ्या प्रणाली एकाच वेळी कार्य करत असल्यामुळे हवामानाचा रंग बदलला आहे, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उन्हाचा खेळ सुरू झाला. कोकण किनार्या वर आधीच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. IMD Weather Alert
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा जोर वाढेल अंदाज हवामान खात्याने दिलाय, तर मराठवाडा विदर्भाला ही याचा फटका बसणार आहे. शेती मध्ये आधीच पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत, आता आणखी पावसाचं मारा वाढल्यास खरीप हंगामाचे मोठे नुकसान होईल अशी भीती आहे.
तर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या तरी रेड अलर्ट नाही पण जर कमी दाबाचा पट्ट्याची तीव्रता वाढली तर पुढील 48 तासात वादळाच्या रूपात संकट उडवलं जाऊ शकतं. त्याचा फटका ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सध्या शेतीच्या कामात धावपळ न करता हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचा पालन करावं. पिक वाचवण्यासाठी कुठे शक्य असेल तिथे पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करा, कारण हे जर पट्ट्या आणखी तीव्र झाले तर पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा मारा आणि वादळासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भ मराठवाड्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात रात्रभर जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय, तर गावाकडे जनावर शेती दोन्ही अडचणीत आली आहेत. खरंतर सप्टेंबरच्या अखेरस पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो, पण यंदा मात्र मान्सून अजून देखील घट्ट बसलेला असून ऑक्टोबरच्या पहिले आठवड्यापर्यंत पावसाचा जोर टिकणार असल्याचा हवामान खात्यांना सांगितल आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवसात अत्यंत निर्णय ठरणार असून प्रत्येकाने सतर्क राहून खबरदारी घेणे गरजेचे आहे.