IMD Weather Alert | महाराष्ट्रातील वातावरण शांत असताना पुन्हा एकदा निसर्गाने त्याचे रौद्र रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले, डीप डिप्रेशन आता चक्रीवादळाच्या दिशेने सरकत आहे त्याचं नाव आहे मोथा. या वादळाचा वेग तब्बल ताशी 110 किमी पर्यंत पोहोचू शकतो, असं हवामान विभागाने स्पष्ट केल आहे. येत्यात 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान या वादळाचा पण महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम दिसून येत असून, पुढच्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाचे संकट निर्माण झालेल आहे. IMD Weather Alert
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आधीच शेतकरी कुठे बसा सावरतोय त्यातच पुन्हा हे मोठ संकट शेतकऱ्यांना हधरवणारे होणार आहे. त्याचबरोबर कोकणात आणि मध्ये महाराष्ट्रात तसेच विदर्भात देखील पावसाचा जोर राहील अशी शक्यता आहे.
तर काही हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार पूर्व मध्य अरबी समुद्र आणखी एक डिप्रेशन तयार झाल असून, केळी पुढे जाऊन वादळात रूपांतर होऊ शकत. सध्या विदर्भाने मराठवाड्यात Orange Alert जारी करण्यात आला आहे. नागपूर, अकोला, बुलढाणा, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आलेला असून रायगड, पुणे, नाशिक या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे.
दरम्यान, मोथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाच संकट वाढल आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भ मराठवाड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. यामुळे अनेक ठिकाणी कापूस, सोयाबीन, मका, केळी टोमॅटो आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील चार दिवस पाऊस राहणार असून, हवामान विभागाने ही नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावधान्याचा इशारा दिलेला आहे. हवामान कसे राहते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | Weather Alert | राज्याच्या वातावरण पुन्हा एकदा मोठा बदल, हवामान खात्याचा या 21 जिल्ह्यांना अलर्ट
