IMD Weather Update : हवामान खात्याचा मोठा अंदाज, राज्यामध्ये मोठ्या थंडीचा तडाका बसणार त्याचबरोबर हा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update : राज्याच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने एक नुकतीच मोठी अपेक्षा जाहीर केलेली आहे यामध्ये राज्यात आणखी गारठा वाढणार असल्याची अपडेट दिलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर हळूहळू वाढू लागलेला आहे आणि यामुळेच काही ठिकाणी नागरिकांना मोठा थंडीचा फटका बसत आहे. अशातच हवामान खात्याची नवीन अपडेट नक्कीच टेन्शन वाढवणारे ठरणार आहे चला तर जाणून घेऊया नवीन हवामान अंदाज IMD Weather Update

नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. ऐन दिवाळीतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. मात्र नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुलाबी थंडी सुरू झाली आणि आता ती थेट कडाक्याच्या थंडीत बदलत चालली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात शीतलहरी सक्रिय झाल्या असून, डिसेंबर अखेरपर्यंत अशीच थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली असून, येथे तापमान थेट 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. मागील काही दिवसांपासून धुळ्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्याचबरोबर जेऊर आणि निफाड परिसरातही पारा 6 अंशांच्या आसपास घसरला आहे. मालेगाव, अहिल्यानगर आणि गोंदिया येथे 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये तापमान 10 अंशांच्या आसपास आहे. एकूणच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठ्याचा जोर अधिक आहे.

मुंबईतही थंडीचा अनुभव वाढू लागला आहे. पहाटेच्या वेळी तापमान 15 अंशांच्या आसपास नोंदवले जात असून, शहरात थंड वारा जाणवतो आहे. मात्र थंडीबरोबरच मुंबईकरांसाठी दुसरी चिंता वाढली आहे ती म्हणजे हवेच्या गुणवत्तेची. धूळ, धुके आणि धुरामुळे मुंबईची हवा पुन्हा एकदा खराब श्रेणीत गेल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. नरिमन पॉईंट परिसरात धूसर वातावरण दिसून येत असून, लांबच्या इमारती, टॉवर्स आणि समुद्राचे दृश्य अस्पष्ट झाले आहे.

हवेत तयार झालेल्या धुरक्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. खोकला, सर्दी, दम्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून, याचा फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना अधिक बसतो आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दरम्यान, गारठा वाढला असतानाही पहाटेच्या वेळेत नरिमन पॉईंट आणि समुद्रकिनारी मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुंबईकरांची गर्दी दिसून येते, हे विशेष. मात्र पुढील काही दिवसांमध्ये थंडी आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, उबदार कपडे वापरावेत आणि अनावश्यक थंडी टाळावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

एकूणच पाहता, राज्यात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार असून, गारठा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे.

हे पण वाचा | 12 आणि 13 नोव्हेंबरला  मोठ हवामान संकट; हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या

Leave a Comment

error: Content is protected !!