IND vs AUS Free Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर या मालिकेमध्ये रोको म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही मैदानामध्ये उतरणार आहेत. तब्बल सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर हे दोघे स्टार खेळाडू पुन्हा एकदा भारतीय जर्सी मध्ये दिसणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा क्रिकेट बद्दल प्रेम उभारून येत आहे. ही मालिका 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे. आता ही मालिका लाईव्ह पाहण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न पडतो की कुठे पहावी?
19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया मधील पर्थच्या भव्य मैदानावर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरू होणार आहे. या सामान्य द्वारे शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. शुभमन गिल च नेतृत्वात प्रथमच दोन माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. या दोघांचे चाहते उत्सुकताने या मॅच ची वाट पाहत होते. यातील सामन्याच्या मालिकेला भारतीय संघाचा 2017 वर्ल्ड कप साठी तयारी दर्शवत आहे. या विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिका झिंबाब्वे आणि नमीबीयामध्ये होणार आहे. त्यामुळे या मालिकेत प्रत्येक खेळाडू कडून कसे प्रदर्शन होईल याकडे प्रत्येकाचे लक्ष राहणार आहे.
रोहित–विराट चे पुनरागमन पाहण्यासारखे
तब्बल सात महिन्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या दोन आवडत्या खेळाडूंना पुन्हा पुनरागमन करताना पाहायला मिळणार आहे. मैदानावर विराटचा जोश आणि रोहितची शांतता या दोघांच्या असण्याने भारतीय संघाला नवीन ऊर्जा मिळते. शुभमन गिल ने म्हटले आहे की, मी रोहित भाऊ कडून शांत राहण्याची आणि संघात सकारात्मक वातावरण ठेवण्याचे कला शिकलो आहे. विराट कोहली सारख्या खेळाडूंसोबत आपण खेळणं हे मोठ्या भाग्याचे आहे. अनेक वर्षापासून हे दोन्ही खेळाडू भारतीय संघांना उच्च पातळीवर नेण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
लाईव्ह सामना कुठे पहावा?
सर्वात मोठी खुशखबर म्हणजे भारतीय आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील सर्व सामने दूरदर्शन नेटवर्क वरती मोफत प्रसारित केले जाणार आहेत. म्हणजेच DD sports चैनल वर ही मालिका तुम्ही एकदम फ्री मध्ये पाहू शकता. याशिवाय ज्यांच्याकडे स्टार स्पोर्ट नेटवर्क किंवा जो सिनेमा हॉस्टार हे ॲप आहेत ते देखील याद्वारे हा सामना अगदी मोफत होऊ शकतात. म्हणजेच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया अरोमांचक मुकाबला पाहण्यासाठी कोणतेही सबस्क्रीप्शन घेण्याची चिंता नाही. यासाठी फक्त तुम्हाला कोणत्याही स्पोर्ट ॲप वर जायचे आहे किंवा घरी डीडी स्पोर्ट वर मोफत मॅच पाहायची आहे. IND vs AUS Free Live Streaming
ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणारी ही मालिका भारतीय संघासाठी केवळ सराव नाही तर 2017 वर्ल्ड कप कडे जाण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित आणि विराटच्या कामगिरीकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे. दोघेही उत्तम खेळाडू असून संघासाठी आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहेत. मात्र जर प्रदर्शन चांगले राहिले नाही तर त्यांच्या पुढच्या विश्वचषकातील स्थानाबद्दल चर्चा सुरू होतील. क्रिकेटच्या त्यासाठी हा थोडा म्हणजे देवळीपेक्षाही मोठा सण असणार आहे. एकीकडे फ्री मध्ये लाईव्ह मॅच पाहण्याचा आनंद घेता येणार आहे तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावरती पुन्हा उतरणार आहेत हा आनंद देखील वेगळाच आहे.