July 2025 bank news | एखाद्याच्या बँक खात्यात पैसेच नसतील, म्हणजे शून्य बॅलन्स तरीही बँक त्याच्याकडून चार्ज वसूल करत असे, ही गोष्ट अनेक गरीब, मध्यमवर्गीय ग्राहकांच्या जिव्हारी लागणारी होती. शेतकरी, मजूर, किरकोळ दुकानदार, कामगार, पेन्शनधारक यांच्यासाठी तर हा बँक चार्ज म्हणजे एक वेदना ठरायची. पण आता हाच चार्ज थांबवण्यात आला आहे. हो, आता अनेक बँकांनी मोठा निर्णय घेतला आहे. July 2025 bank news
हे पण वाचा | कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज
सुरुवातीला बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक होतं. म्हणजे जर तुमच्या खात्यात ठराविक रक्कम शिल्लक ठेवली नाही, तर दरमहा काही रुपये कट होण्याची शक्यता असायची. यामुळे गरीब खातेदारांचे खातं उघडलं तरी रिकामंच राहतं, कारण थोडेफार जमा झाले तरी ते कापले जायचे. पण आता या सर्व बंधनांना पूर्णविराम मिळाला आहे.
चला तर पाहूया, कोणत्या 6 मोठ्या बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज पूर्णपणे बंद केला आहे :
1. बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने त्यांच्या स्टँडर्ड सेव्हिंग्स अकाऊंटवर १ जुलै २०२५ पासून मिनिमम बॅलन्सच्या अटीवर आधारित चार्ज रद्द केला आहे. अर्थातच, प्रिमियम खात्यांवर मात्र ही सवलत दिलेली नाही.
हे पण वाचा | FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल
2. इंडियन बँक
इंडियन बँकेनं ७ जुलै २०२५ पासून सर्व सेव्हिंग्स अकाऊंटवर मिनिमम बॅलन्स चार्ज पूर्णपणे रद्द केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
3. कॅनरा बँक
मे महिन्यातच कॅनरा बँकेनं सर्व प्रकारच्या सेव्हिंग्स अकाऊंटवर मग ते रेग्युलर असो, सॅलरी असो किंवा एनआरआय मिनिमम बॅलन्सचा चार्ज हटवला आहे.
4. पंजाब नॅशनल बँक (PNB)
PNB नं देखील ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत मिनिमम बॅलन्स चार्ज पूर्णपणे हटवला आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचा थेट फायदा होणार आहे.
5. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
SBI नं तर आधीच २०२० सालापासूनच हा चार्ज हटवला होता. आणि आता त्याचा पुन्हा एकदा अधिकृत पुनरुच्चार करण्यात आला आहे. म्हणजे खात्यात पैसे नसलं तरी कोणताही दंड लागत नाही.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा
6. बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियानं देखील आपल्या ग्राहकांसाठी ही सवलत लागू केली आहे. बँकेच्या अधिकृत पत्रकात सांगण्यात आलं की, वित्तीय लवचिकता वाढवणे आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीत सामान्य नागरिकांना दिलासा देणे, हाच या निर्णयामागचा हेतू आहे.
हा निर्णय का महत्त्वाचा आहे?
शेतकरी बँकेत पैसा टाकतो, कधी फसल्यानंतर मिळालेला. कधी पीक विमा येतो, तर कधी सरकारी योजना. पण एखाद्या महिन्यात काहीच उत्पन्न नसलं, तर चार्जच चार्ज. अशावेळी खात्यातील पैसे शिल्लक राहतच नाहीत. हाच अडथळा दूर झाला आहे.
हा बदल म्हणजे केवळ आर्थिक निर्णय नाही, तर सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. आज जेव्हा बाजारात प्रत्येक गोष्टीवर खर्च वाढला आहे, तिथं बँका ग्राहकांच्या मदतीला येत असतील तर ती एक सकारात्मक दिशा आहे.
Disclaimer:
वरील माहिती ही विविध बँकांच्या अधिकृत वेबसाइट्स, प्रेस रिलीज आणि माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार सादर करण्यात आलेली आहे. प्रत्येक बँकेचे धोरण वेगळे असू शकते. त्यामुळे खात्री करण्यासाठी संबंधित बँकेच्या अधिकृत शाखेत किंवा वेबसाइटवर एकदा चौकशी करणे आवश्यक आहे. येथे दिलेली माहिती ही केवळ सामान्य जनतेच्या माहितीकरिता आहे, याचा उपयोग आर्थिक सल्ला समजून करू नये.