Kanda Bajar Bhav: राज्यात दिवाळीचा उत्साह असल्यामुळे बाजारपेठांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त पैशाची आवश्यकता असल्यामुळे बाजारात तुफान गर्दी झाली आहे. मात्र कांद्याच्या बाजारात शांतता पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये एकूण फक्त 6218 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत ही आवक खूपच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे उन्हाळी कांद्याची आवक तर केवळ दोन क्विंटल वर येऊन थांबली आहे. आवक घटल्यामुळे दरामध्ये किरकोळ वाढ होताना दिसत आहे.
आज राज्यात सर्वाधिक कांद्याचे आवक शेवगाव बाजारात झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता. या ठिकाणी नंबर एक वाणाच्या कांद्याला कमीत कमी 900 तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नंबर दोन वाणाच्या कांद्याला 600 ते 750 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला आहे. नंबर तीन वाणाच्या कांद्याला सर्वात कमी 200 ते 350 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आवक घटले असली तरी कांद्यात मनाव अशी वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या दरात वाहतूक खर्च आणि मजुरी वजा केल्यानंतर हातात काहीच उरत नाही. तरीसुद्धा बाजारात कांद्याला मागणी टिकून आहे कारण दिवाळीनंतर पुन्हा नवीन मालाची आवक वाढेल अशी अपेक्षा आहे.
लोकल कांद्याला चांगला दर
आजच्या व्यवहारात सर्वात जास्त दर लोकल कांद्याला मिळाला आहे. वाई येथे लोकल कांद्याला 1000 ते 1600 रुपये दरम्यान प्रत्येक क्विंटल दर मिळाला आहे. तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला आहे. पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर कामठी बाजारात सर्वाधिक 1500 रुपये प्रति क्विंटल दर लोकल कांद्याला मिळाला आहे. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते सध्या ग्रामीण भागात लोकल कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून, त्याचा थेट परिणाम लोकल कांद्याच्या बाजारभावावर होताना दिसत आहे. Kanda Bajar Bhav
उन्हाळी कांद्याची आवक मंदावली
राज्यात उन्हाळी कांद्याची आवक खूपच कमी झाले असून आज केवळ दोन क्विंटल कांद्याचे आवक झाली आहे. तीही भुसावळ बाजारातून येथील उन्हाळी कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. फादर कायम स्थिर आहे परंतु आवक अत्यंत कमी झाल्यामुळे बाजारात उन्हाळी कांद्याचा वाण उपलब्ध होत नाही. दिवाळी झाल्यानंतर बाजारात नवीन कांदा येण्यास सुरुवात होईल. पण सध्या आवक मर्यादित असल्याने शेतकऱ्यांमध्ये दरवाढीचे अपेक्षा केली जात आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांद्याचे दर पुन्हा वाढू शकतात.
राज्यातील प्रमुख शहरातील बाजारभाव
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| कोल्हापूर | — | क्विंटल | 1398 | 400 | 1600 | 800 |
| चंद्रपूर – गंजवड | — | क्विंटल | 710 | 1400 | 2500 | 1700 |
| पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 5 | 1200 | 1400 | 1300 |
| वाई | लोकल | क्विंटल | 9 | 1000 | 1600 | 1300 |
| कामठी | लोकल | क्विंटल | 6 | 1000 | 2000 | 1500 |
| शेवगाव | नं. १ | क्विंटल | 1460 | 900 | 1400 | 1150 |
| शेवगाव | नं. २ | क्विंटल | 1220 | 600 | 800 | 750 |
| शेवगाव | नं. ३ | क्विंटल | 1408 | 200 | 500 | 350 |
| भुसावळ | उन्हाळी | क्विंटल | 2 | 1000 | 1000 | 1000 |
