Ladki Bahin Yojana: दिवाळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना सत्तेवर महिन्याचा हप्ता मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार द्वारे केले जाते. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये याप्रमाणे मदत जमा करण्यात आलेले आहे. दरम्यान या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व या योजनेतून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने इ केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. याच प्रक्रियाबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ई–केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा होणार
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना या योजनेची ई केवायसी प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र ह्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हर मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. सध्या दररोज तब्बल चार ते पाच लाख महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. आत्तापर्यंत एक कोटी दहा लाख पेक्षा जास्त महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून अडीच लाखापेक्षा जास्त महिलांची प्रक्रिया 90% होऊन अधिक पूर्ण झालेले आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यापुढे म्हणाल्या, पूरग्रस्त भागातील महिलांसाठी आम्ही पंधरा दिवसाची मुदत वाढ देणार आहोत. त्यामुळे त्या भागातील महिलांनी काळजी करू नये.
ई–केवायसी करण्यासाठी मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून काही आठवडे बाकी असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. कारण भविष्यात यावर आणखीन तांत्रिक ताण वाढू शकतो. त्याचबरोबर मुदत वाढ होईल अशी अपेक्षा देखील ठेवू नका. सरकारने दिलेल्या वेळेत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्या. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे ₹1,500 आले की नाही? कसे तपासावे? जाणून घ्या
अनेक महिला गुगलवर ladki bahin Yojana ekyc शोधत आहेत आणि त्या चुकीच्या वेबसाईटवर जात आहेत. त्यापैकी अशा अनेक वेबसाईट येत आहेत ज्या सरकारच्या नसून दुसऱ्याच साइटवर जात आहेत. अशा साइटवर तुमचा डाटा चोरी जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना तुम्ही अधिकृत वेबसाईटवरच केवायसी करत आहात का नाही याचे खात्री करा. फेक वेबसाईट पासून दूर राहा जेणेकरून तुमचा डाटा चोरी जाणार नाही.
ई–केवायसी प्रक्रिया कशी करावी?
लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया अगदी सोपी आहे. खालील दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- मुख्य पृष्ठावर दिलेल्या ekyc बॅनर वर क्लिक करा.
- उघडलेल्या फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक आणि capture code टाका.
- त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी मिळेल तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे का नाही हे तपासले जाईल. जर पूर्ण झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.
- नसल्यास पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जाईल.
- ओटीपी प्रक्रिया पूर्ण करून आपला जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक घोषणापत्र मान्य करा.
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर success तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज दिसत.