Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहिणी योजना बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. नुसती अपडेट नसून महिलांसाठी एक गुड न्यूज असणार आहे. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी खूप उपयोगी ठरत आहे. या योजनेअंतर्गत आता पर्यंत महिलांच्या खात्यावरती एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणजे पात्र असणाऱ्या एका महिलेला 22 हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. Ladki Bahin Yojana
परंतु महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली हे खरं परंतु अजून महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत व सक्षम बनवण्यासाठी शासनाने लाडक्या बहिणी योजनेच्या मार्फत एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
महत्त्वाचे बाब म्हणजे ही योजना महिलांसाठी खूपच महत्त्वाची ठरत आहे या योजनेचा लाभ गेल्या अनेक महिन्यापासून महिलांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा करण्यात येत आहे. तर याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरती एक महत्त्वाची माहिती दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आले असून येत्या काळात राज्यातील उर्वरित भागांमध्ये देखील या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये जवळपास 57 पात्र लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज वाटप सुद्धा केलेले आहे. या संबंधात पात्र लाडक्या बहिणींना मत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलेला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती एक पोस्ट करत माहिती दिली.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे?
त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्या म्हणाल्या की आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेच्या या क्या कार्यक्रमासाठी मंत्री उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातून महिलांच्या सक्षम करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचा सांगितलं.
तसेच महिलांना आर्थिक आणि व्यवसायात पाठबळ देण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन आणि विविध सेवा पुरवणार यामध्ये मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी सर्विस सेंटर आणि महिला विशेष मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महिला कक्षाचे आज शुभारंभ करण्यात आले आहे.
यामुळे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केलेल्या व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज वाटप करताना विशेष आनंद झाला आहे. त्यापुढे म्हणाले की हा धनवेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा एक नवीन उद्योग उभा करण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले बळ आहे. महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
तर तसेच त्यापुढे म्हणाल्या या उपक्रमाबद्दल मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार श्री प्रवीण जी दरेकर साहेब व तथा उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ जी कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..