Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी दिवाळी आधीच गोड बातमी मिळाली आहे. मागील काही दिवसापासून लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा होऊ लागले आहेत. मागील काही दिवसापासून हप्ता कधी येणार या प्रश्नाने महिलांची चिंता वाढवली होती. पण आता सरकारने अधिकृतपणे महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. Ladki Bahin Yojana
राज्य सरकारने 10 ऑक्टोबर पासून महिलांच्या खात्यात हा निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच ज्या महिलांची बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले आहेत त्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट महाडीबीटी द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दिवाळीचा काळ सुरू होण्याआधी महिलांना हा हप्ता मिळाला असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे. दिवाळी सारखा मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता त्यामुळे महिला आतुरतेने सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होत्या. शेवटी त्यांचे प्रतीक्षा संपले असून महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
ई–केवायसी न केल्यास अडचण
दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढील महिन्याचा म्हणजेच ऑक्टोबर चा हप्ता फक्त त्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे ज्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. अजून अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याला ही अट लागू केली नाही. मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही. कारण पुढील हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या विश्वासाने सुरू झालेली ही सक्षमीकरणाची क्रांती अखंडितपणे पुढे जावे म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी पुढील दोन महिन्याच्या आत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. सरकार प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे. पण शासनाच्या नोंदीत अचूक माहिती असणे आवश्यक आहे.
ई–केवायसी कशी करावी?
- सर्वप्रथम आपल्या मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. https://ladakibahin.maharashtra.gov.in
- eKYC या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका व ओटीपी द्वारे पडताळणी करा.
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्याची सृष्टी स्क्रीनवर दिसेल.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त काही मिनिटाचा कालावधी लागत आहे पण जर तुम्ही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ बंद होऊ शकतो.
राज्यातील अनेक महिलांसाठी ही योजना म्हणजे फक्त आर्थिक मदत देणारी योजना नसून त्यांना सन्मानाने राहता यावे यासाठी आहे. महागाईच्या काळात पोटाचा हप्ता सुद्धा संसाराच्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठी मदत करतो. अनेक महिला या पैशातून त्यांचा घर खर्च भागवत आहेत. दिवाळीनिमित्त महिलांना हा हप्ता देऊन सरकारने खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला आहे.