Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबर 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आता या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत संकेत दिल्यामुळे लाखो महिलांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई–केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर एवढी ठेवण्यात आली आहे. गावोगावी केवायसी करण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर रांगा लागल्या आहेत नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अनेक ठिकाणी केवायसी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे केवायसी आता कशी पूर्ण करावी असा प्रश्न महिलांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुदत वाढीसाठी मागणी आणि आता सरकार होऊन त्यावर गांभीर्याने विचार केला जात आहे.
मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज जवळपास पाच लाख महिलांची केवायसी प्रक्रिया वेबसाईट द्वारे पूर्ण केली जात आहे. आतापर्यंत तब्बल एक कोटी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून हा आकडा दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे महिलांना पुन्हा एकदा संधी देऊन मुदतवाढ दिली जाणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी मुदतवाढ
मराठवाडा सोलापूर धाराशिव आणि आसपासच्या भागात गेल्या काही महिन्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक महिलांची घरे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पुरात वाहून गेले होते. यामुळे त्या महिलांसाठी केवायसी करण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही परिस्थिती पाहून सरकारने ई केवायसी करण्याची मुदत पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पूरग्रस्त जिल्ह्यांची परिस्थिती पाहता मुदत वाढीवर गांभीर्याने विचार केला आहे. लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. यामुळे हजारो महिलांच्या मनात नवीन आशेचे किरण निर्माण झाले आहे.
वेबसाईट मध्ये बदल होणार
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये सरकार काही महत्त्वाचे बदल करणार आहे. यामध्ये ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी स्वतंत्र ऑप्शन दिले जाणार आहे. त्या महिलांना येथे डेथ सर्टिफिकेट घटस्फोटाचा दाखला यापैकी एक कागदपत्र अपलोड करावा लागणार आहे. यामुळे आतापर्यंत अडचणीत सापडलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. Ladki Bahin Yojana
राज्यातील गोरगरीब महिलांसाठी ही योजना मोठी आर्थिक आधार देत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे दरमहा १५०० रुपये महिलांचा घर खर्च भागवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. ज्या महिलांनी अजून केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही त्यांना मुदतवाढ दिल्यानंतर ते देखील या योजनेचा अखंडित लाभ मिळू शकतील. मुदतवाढ मिळो किंवा नाही मिळो अजूनही काही दिवस शिल्लक आहे त्यामुळे महिलांनी अजिबात वेळ वाया न लावता त्वरित जवळील ऑनलाइन सेंटरवर जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या किंवा आपल्या मोबाईलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करा.