Limbu Bazar Bhav | तुम्हाला तर माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडत असतात. याच्या मागचे कारण म्हणजे उन्हाळा मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा तडाका वाढला आहे. व यंदा राज्यामध्ये प्रामुख्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात बाकीच्या पिकांप्रमाणे देखील लिंबूच्या उत्पादनात घट झाल्याची दिसून येत आहे. तसेच बाजार मध्ये भाजीपाल्याची आवक देखील कमी झाल्याची दिसून येत आहे.
यंदा मान्सून काळामध्ये पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबत भाजीपाल्यांची देखील लागवड कमी प्रमाणात झाली असल्याने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. व याचाच फटका येत्या काळामध्ये शेतकऱ्यांबरोबर नागरिकांना देखील बसण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
शेती विषयक व हवामान अंदाज माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परिणामी सध्या उत्पादनात मोठी गट झालेली आहे. व त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने शेती पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. व तसेच भरून आलेले फळबाग देखील मातीमोल झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांना व भाजीपाल्यांना देखील मोठा फटका बसला होता. आणि काही ठिकाणी फळ गळती तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान यामुळे शेत पिकचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता उन्हाची चाहूल लागताच (Limbu Bazar Bhav) लिंबाचे दर चांगलेच गंगणाला भिडलेले दिसून येत आहे. परंतु शेतकऱ्यांकडे अपेक्षित असे उत्पन्न नसल्यामुळे त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. व ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात माल आहे. त्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे.
तसेच यंदा कांद्याचे दर देखील चांगले वाढले होते. परंतु सरकारने मधीच निर्यात बंदी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. परंतु शेतकऱ्या मध्यंतरी निर्णय मागे घेतल्याच्या चर्चामुळे कांद्याचे दर 2500 रुपयांवर गेले होते कांद्याचे दर पुन्हा एकदा कोसळले आहेत.
त्याच बरोबर आता भाजीपाल्याचे दर देखील वाढू लागली आहे. त्याचे कारण म्हणजे अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे बाजारात वाढणारी मागणी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. गवारी हिरव्या मिरच्या सोबत हिरव्या पालेभाज्यांचे देखील दर गगनाला भिडले आहेत. याचबरोबर शहरातील राहणाऱ्या नागरिकांना महागाईच्या जी झळा सहन करावा लागत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहे.
परंतु शेतकऱ्यांना योग्य दर मिळूनही शेतकरी उपाशी असलेले चित्र सध्या पाहायला मिळत आहे. परंतु येत्या काळामध्ये वातावरण कसे राहणाऱ्या कडे पाहण्यासारखे राहणार आहे. नागरिकांसोबत शेतकऱ्यांनाही महागाच्या झळा सहन करावा लागणार का हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
( अशा अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून आमची टीम तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न करेल व हा लेख तुम्हाला आवडले असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद…)