शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी मिळणार? आली मोठी अपडेट समोर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये लवकरच आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा होऊ शकते अशी चर्चासमोर आली आहे. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, यासोबत बाजार भाव योग्य न मिळाल्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. हातातलं पीक गेलं, बँकांनी थकबाकीच्या नोटिसा पाठवल्या, सावकारांनी दार ठोठावले आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र आता सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करण्यासाठी सरकार पावलं उचलू शकते अशी अशा शेतकऱ्यांना वाटू लागलेली आहे. Loan Waiver News

राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल 24 लाख 27000 शेतकऱ्यांवर 35 हजार कोटीहून अधिक थकबाकी आहे. एवढा बोजा डोक्यावर असताना बँकेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कर्जदार शेतकरी आहेत. येथे पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे बँकेचे जवळपास 4000 कोटी थकले आहेत. अमरावती, बीड, बुलढाणा, नांदेड, जालना, परभणी, यवतमाळ सह अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकरी या थकबाकीत अडकले आहेत.

शेतकऱ्यांचे खरे चित्र म्हणजे दिवसभर शेतात राबणं कामगारांना आणि कर्जाचा हिशोब मिटवणे. थकबाकी वाढते, नवीन कर्ज मिळत नाही, व्यवस्थित पीक मिळत नाही घर कसे चालवायचे पोरांचे शिक्षण आणि शेतीत लागणारा खर्च. या मुळे शेतकरी खाजगी सावकारांकडे कर्ज घेतात आणि कर्जाच्या जाळ्यात अडकतात, यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेल आहे. अंदाजे दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर दीड- दोन हजार कोटींचं सावकारीचा कर्ज आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, दररोजचा सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही आकडेवारी मन हे लावून टाकणारी आहे.

या सगळ्या पार्श्वभूमी वरती विरोधक सतत कर्जमाफीची मागणी करत आहे. महायुती सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेतील हा मुद्दा होता. आता हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने सर्व जिल्ह्यातील थकबाकीची माहिती मागवली आहे. ऑक्टोबर अखेर अहवाल तयार होऊन सरकार समोर जाणार आहे आणि त्यानंतर अधिवेशनात कर्जमाफीची मोठी घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता लवकरच सरकार कोणता निर्णय घेते याकडे पाहण्यासारखे ला आलेले आहेत अनेक शेतकरी सरकारच्या या निर्णयाकडे डोळे लावून बसलेला आहे सरकार खरंच कर्जमाफी करणार का हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. अशाच बातमीसाठी आम्हाला फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत राहील.

1 thought on “शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी मिळणार? आली मोठी अपडेट समोर!”

Leave a Comment

error: Content is protected !!