LPG Cylinder Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपनी दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करत असते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे छोटे उद्योग, हॉटेल व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त
आज पासून म्हणजे एक नोव्हेंबर 2025 पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पाच रुपयाची घसरण झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या दरानुसार, दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1590.50 रुपये इतकी आहे. याआधी हा दर 1595.50 रुपये एवढा होता. घरगुती वापरला जाणारा 14.2 किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या जुन्या दरामध्ये सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे. दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये इतकी आहे.
शहरानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर
- दिल्ली:— 1590.50
- कोलकत्ता:— 1694.00 रुपये
- मुंबई:— 1542.00
- चेन्नई:— 1750.00 रुपये
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करून जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाल्यामुळे भारतातही एलपीजी गॅस सिलेंडरचे दर बदलत आहेत.
मागील सहा महिन्यात मोठी घसरण
मार्च 2025 मध्ये दिल्लीतील 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1803 रुपये इतकी होती. मात्र एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत सलग सहा महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. केवळ ऑक्टोबर मध्येच एकदा 15.50 रुपयाची वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आता घसरण झाली आहे. एकंदरीत पाहिलं तर मागील सहा महिन्यात जवळपास 232 रुपयाची घसरण झाली आहे. LPG Cylinder Price
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असल्यामुळे याचा थेट परिणाम एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीवर होताना दिसत आहे. लिक्विड पेट्रोलियम गॅस हे कच्च्या तेलाचे उपउत्पादन असल्यामुळे तेलाचे दर कमी झाले की एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती देखील कमी होतात. ही कपात थोडी वाटत असली तरी रेस्टॉरंट ढाबे च्या हॉटेल आणि लहान व्यवसायकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. दररोज गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर असणाऱ्या व्यावसायिकांना दरात झालेली प्रत्येक रुपयाची घट महत्त्वाची ठरते. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर देखील होतो. जर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर घसरला तर हॉटेल्स मधील वस्तूंचे दर देखील स्थिर राहतात. मात्र यात वाढ झाली तर त्या किमतीत वाढ होते आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.
घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर
मागील अनेक महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आहे तसेच स्थिर आहेत. सरकारकडून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण केली जाईल अशी अपेक्षा अनेक गृहणींना होती. सणासुदीच्या काळात वाढलेला खर्च आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने लवकरात लवकर घरगुती सिलेंडरचे दर कमी करावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र या महिन्यात देखील घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही घसरण झालेली नाही.
