Maharashtra Cotton Market : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक नगदी पीक आहे. याचे उत्पादन महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये घेतले जातात. काही भागांमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे या पिकावरती अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागामध्ये या पिकाला पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते.Maharashtra Cotton Market (In this article, we are going to know in detail which market committee of Maharashtra is getting the highest price for cotton, so farmers will benefit a lot from this, so read this article in detail)
या पांढरे सोन्याला येत्या काळात काय दर मिळतो हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला नव्हता. चक्क शेतकऱ्यांना कोडीमोल दरामध्ये कापूस विकावे लागले होते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना त्याच दरामध्ये कापूस विकावा लागतो का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. चला तर दिवाळीनंतर कापसाच्या दरामध्ये किती बदल झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत.
यंदाही विजयादशमीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू झालेली आहे. आता हळूहळू बाजारामध्ये देखील कापूस येण्यास सुरुवात झालेली आहे. तथापि बाजारामध्ये कापसाला काय दर मिळतो हे देखील जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु बाजार भावाबाबत बोलायचं झाल्यास बाजार भाव अजून देखील दाबावतच आहेत. अजूनही कुठेही कापसाला सर्वाधिक दर मिळालेला दिसून येत नाही.
शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या कापसाचे बाजारभाव हे साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहे. सरकारने देखील कापसाला साडे सात हजार असा हमीभाव जाहीर केलेला आहे परंतु दर हे हमी भावापेक्षा देखील कमीच आहेत.
या बाजार समितीमध्ये मिळते सर्वाधिक दर
कापसाच्या बाजार भावाबाबत बोलायचं झाल्यास विदर्भातील मध्यम धाग्याच्या कापसाला सर्वाधिक दर मिळालेला आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 7050 ते कमाल 7300 आणि सरासरी 7150 रुपये असा भाव मिळालेला आहे.
तसेच पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम भागाच्या कापसाला सहा हजार आठशे ते कमाल 7,100 रुपये आणि सरासरी 7050 रुपये सादर मिळालेला आहे. तसेच सिंधू शेलु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान 7,209 कमाल 7209 आणि सरासरी 7209 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे.