Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार मोठे निर्णय घेणार आहे. सध्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आली आहे. आज माननीय अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे याच्यामध्ये महिलांसह व नागरिकांसाठी मोठा योजनेची घोषणा केलेली आहे.Maharashtra Farmer Scheme
यासंदर्भामध्ये अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे खरंतर नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठे निर्णय घेणारे नक्कीच होते कारण त्यांना या लोकसभेमध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही शेतकऱ्यांची नाराजी असल्यामुळे तसे राजकीय अंतर्गत नाराजी असल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसलेला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचा परिणाम लक्षात घेऊन महायुतीने मोठा निर्णय घेतलेला आहे.
विधानसभा अवघ्या तीन महिन्यात काल बाकी राहिला असताना महाराष्ट्रासाठी महायुतीने मोठा निर्णय घेतलेला आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नक्कच मोठे पाऊल उचलणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज झालेल्या अर्थसंकल्पनामध्ये राज्यातील महिलांसाठी खास निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना एका वर्षामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा असे ठेवण्यात आलेले आहे तसेच सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे.
खरीप हंगाम 2023 मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मला देणार अशी घोषणा करण्यात आली आहे ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.
त्यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे ही मदत शेतकऱ्यांना दोन हेक्टर वर सोयाबीन किंवा कापूस लागवड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे