Maharashtra Marathwada Rain News | अरे बापरे पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी धोकाच्या इशारा, हवामान खात्याची मोठी अपडेट समोर आली. आधीच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे अशातच पुन्हा हवामान खात्याचा हा इशारा शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका उडवणार आहे. आधीच कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेले आहेत पिक वाहून गेली, संसाराचा पूर्ण साहित्य वाहून गेलं, धान्य, कपडे पाण्यात बुडाले आणि अनेक कुटुंब उघड्यावर आली. अजूनही हा पाऊस थांबायचं नाव घेत नाही.
भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला असून पुढील 48 तासात महाराष्ट्रात धो धो पाऊस पडणार आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने थेट रेड अलर्ट दिलेला आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण पाऊस पूर्णपणे थांबणार नाही. उलट नदी नाले सतत भरून वाहत असल्याने भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
मराठवाड्यात जनजीवन विस्कळी
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव या भागात अजूनही पावसाचा तडाका जाणवतोय. चलन्यातील सोमनाथ परिसरात खरिपातील सोयाबीन, कपाशीचं पीक पाण्यात बुडून गेली आहेत. अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनला थेट शेतातच कोंब फुटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. शेतकरी थेट सरकारला ओरडून सांगताय पंचनामे नकोत, वेळ वाया घालू नका, ओला दुष्काळ जाहीर करा आणि मदत द्या!
यंत्रणा अलर्ट मोडवर
पुणे हवामान विभागाने स्पष्ट केला आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा पाऊस सुरू झाला आहे. पुढील दोन दिवस तो धोका कायम राहणार आहे. यामुळे प्रशासन हाय अलर्ट वर आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातंय, मदत शिबिरा सुरू करण्यात आलेले आहे धान्य किट वाटप सुरू होतंय. मात्र नागरिकांमध्ये भीतीच वातावरण कायम आहे.
1 thought on “महाराष्ट्रात पुढची 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा मोठा इशारा. शेतकऱ्यांनो सावध रहा!”