या दिवशी येणार ‘लाडकी बहिण’ हप्ता? राखीच्या आधी खात्यात पैसे, पण अजूनही बघा खात्यात आले की नाही! 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra women scheme | राज्य सरकारची ‘माझी लाडकी बहिण योजना’ गेल्या वर्षभरापासून महिलांसाठी आधारस्तंभ बनली आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झाला होता. आणि यंदाही हाच शुभमुहूर्त पकडत राज्य सरकार राखीपौर्णिमेच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता देणार आहे, ही माहिती जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष बाब म्हणजे यंदा जुलैसोबत ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे रक्षाबंधन सणाचा आनंद दुप्पट होणार आहे.Maharashtra women scheme

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

मात्र अजूनही हजारो लाडक्या बहिणी या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. जुलै संपत आला तरी काहींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांना हे समजणंच कठीण जातं की त्यांचं नाव मंजूर यादीत आहे की नाही, की पैसे आलेत की नाही.

गेल्या वर्षीपासून लाडकी बहिण योजना कशी झाली सुरू?

२०२४ मध्ये २९ जून रोजी ही योजना सुरू झाली. त्याच वर्षी रक्षाबंधन दिवशी म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्यांदा महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले. आणि आता एक वर्ष पूर्ण होत असून, १३ वा हप्ता मिळण्याची वेळ आली आहे. पण यंदा सरकार हप्ता रक्षाबंधनपूर्वीच देणार असल्याने बहिणींची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे तपासा अशा तीन पद्धतींनी

  • नारी शक्ती दूत’ ॲप वापरा

गुगल प्ले स्टोअरवरून ‘Nari Shakti Doot’ ॲप डाउनलोड करा.

‘मंजूर यादी’ किंवा ‘अर्जाची स्थिती’ पर्याय निवडा.

आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकून तुमचं नाव यादीत आहे की नाही ते तपासा.

  • अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा

वेबसाइट: ladakibahin.maharashtra.gov.in

‘अर्जदार लॉगिन’वर क्लिक करा.

तुमचा मोबाइल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

मंजूर यादी विभागात तुमचं नाव शोधा.

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

  • ऑफलाइन मार्ग  अंगणवाडी केंद्रात जा

जवळच्या अंगणवाडी किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन माहिती मिळवा.

आधार, अर्ज क्रमांक किंवा मोबाइल नंबर जवळ ठेवा.

तुमच्या खात्यात पैसे आले का हे तपासताना एक गोष्ट लक्षात घ्या  सरकार यादी नियमित अपडेट करतं. त्यामुळे जर अजून नाव यादीत नसेल, तर दोन दिवसांनी पुन्हा एकदा तपासा. राखीपौर्णिमेचा सण अगदी उंबरठ्यावर आहे आणि सरकार सुद्धा यंदा बहिणींना डबल हप्ता देण्याचा विचार करत असल्याने, लवकरच पैसे खात्यावर जमा होतील अशी आशा आहे.

Disclaimer:

वरील माहिती ही विविध अधिकृत शासकीय संकेतस्थळे, अ‍ॅप्स आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दिली आहे. योजनेशी संबंधित अंतिम निर्णय, हप्ता वितरणाची तारीख आणि रक्कम यामध्ये बदल होऊ शकतो. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment