Maize Market Update: मकाच्या बाजारभावात मोठी वाढ! ‘या’ बाजारात विक्रमी आवक; जाणून घ्या आजचा दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maize Market Price: यावर्षी राज्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस तूर यासारख्या प्रमुख पिकाचे उत्पादन घटले आहे. मात्र या सर्व नैसर्गिक आव्हानांमध्ये मका हे एकमेव पीक चांगले ठरले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी चांगली साजरी केली जाऊ शकते. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 22000 क्विंटल मकाची विक्रम आवक झाली आहे. मेळघाट परतवाडा आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी गर्दी केली आहे.

दिवाळी पूर्वीचा हा बाजार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी सणासारखाच ठरत आहे. बाजार समितीच्या आसपास पहाटेपासूनच वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने तर काही शेतकऱ्यांनी खाजगी वाहनांमधून आपला शेतमाल बाजारामध्ये विकण्यासाठी आणला आहे. वाढलेल्या अवकेमुळे भाऊ थोडे गडबडले असले तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसत आहे. Maize market price

सध्या मकाला किती मिळतोय तर?

सध्या बाजारामध्ये मक्याला प्रतिक्विंटल 1200 ते 1300 रुपये असा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हा दर जवळपास 1800 रुपयापर्यंत गेला होता. मात्र आवक वाढल्यामुळे दरात काही प्रमाणात घट झाली आहे. तरीसुद्धा शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत आहे. कारण दिवाळी जवळ आल्यामुळे घर खर्च किराणा मजुरी आणि सणासुदीच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे माल विक्री साठी घेऊन जाणे अनिवार्य बनले आहे.

यावर्षी राज्यात अनेक भागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यातील सोयाबीन तुर्कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. पण मका मात्र या दुष्काळी परिस्थिती देखील टिकून राहिली आहे. काही ठिकाणी मकाचे उत्पादन चांगले झाले तर काही भागांमध्ये अपेक्षित एवढं कमी असलं तरी बाजारात विक्रीसाठी पुरेसा माल आला आहे. म्हणूनच या अतिवृष्टी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मका म्हणजेच आर्थिक आधार बनली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment