Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच 4 हजार रुपये जमा होणार आहे. त्याबाबत शासनाने देखील तयारी केलेली आहे नेमकी हे चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत.Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana
भारत सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे. ती म्हणजे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत वर्षासाठी ₹6000 रुपयांची आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने देखील एक महत्वकांशी योजना राबवली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या योजनेप्रमाणे ₹6,000 चा हप्ता दिला जातो. ही योजना भारत सरकारच्या योजनेच्या आधारे चालवली जात आहे.
या योजनेअंतर्गत फक्त भारत सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थ्यांनाच लाभ दिला जात आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी असेल तर तुम्हालाही राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकार अंतर्गत 2254 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये
5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे. हा हप्ता वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित साधून राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जाहीर केलेला आहे. आता या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर ती प्रक्रिया पूर्ण करायचे आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे.