New Rules : दरवेळेस दर महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही नवीन नियम लागू होत असतात आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडतो. आता ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस उरले आहेत आणि नोव्हेंबर महिना अगदी जवळ आलेला आहे पण या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक नंबर पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे प्रत्येक नागरिकाला थेट लागू होतील. या नियमांचा संबंध तुमच्या बँक खात्याशी आधार कार्डशी गॅस सिलेंडरच्या दराशी आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी आहे त्यामुळे हे नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. ही कोणती नियम आहेत ज्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे त्यासाठी ही बातमी नक्की वाचा. New Rules
एकाच बँक खात्यावर चार नॉमिनी ठेवता येणार (Four nominees can be placed on the same bank account.)
आतापर्यंत अनेक लोक बँक खात्यात फक्त एक किंवा दोन नॉमिनी ठेवू शकत होते. पण आता १ नोव्हेंबरपासून बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा २०२५ लागू होणार असून, ग्राहकांना एका बँक खात्यावर, लॉकरवर किंवा जमा ठेवीवर कमाल चार नॉमिनी ठेवण्याची परवानगी मिळेल. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना पैसे मिळवण्यात अडचण येणार नाही. हा बदल कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे.
एसबीआय क्रेडिट कार्डवर नवा शुल्कदर (New charges on SBI credit cards)
जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर हा बदल तुमच्यासाठी थेट महत्त्वाचा आहे. नोव्हेंबरपासून असुरक्षित (Unsecured) क्रेडिट कार्डवर 3.75% पर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. तसेच जर तुम्ही CRED, CheQ, Mobikwik सारख्या थर्ड पार्टी अॅप्सद्वारे शाळा, कॉलेज किंवा इतर कोणत्याही संस्थेचे शुल्क भरत असाल, तर अतिरिक्त 1% शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, पुढे अशा व्यवहारांपूर्वी दोनदा विचार करावा लागेल.
आधार कार्ड अपडेटचे नवे नियम (New rules for Aadhaar card update)
UIDAI ने १ नोव्हेंबरपासून आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला फक्त बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन) अपडेटसाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. पण नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांसारखी सामान्य माहिती तुम्ही थेट ऑनलाइन अपडेट करू शकाल. UIDAI आता तुमची माहिती पॅन, पासपोर्ट, रेशन कार्ड, मनरेगा, शाळेच्या नोंदी यांसारख्या सरकारी डेटाबेसमधून आपोआप पडताळणार आहे.
LPG गॅस सिलिंडरच्या दरात बदल (Change in LPG gas cylinder price)
आपल्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल केले जातात. मागील महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती, तर घरगुती सिलिंडरचा दर स्थिर होता. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी गॅसचे दर कमी होतात का वाढतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण हाच दर महिन्याभराचं बजेट ठरवतो.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी सेबीचे नवे नियम (SEBI’s new rules for mutual fund investors)
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही नोव्हेंबर महिना महत्त्वाचा आहे. SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) ने म्युच्युअल फंड व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. १ नोव्हेंबरपासून, जर एखादा AMC (Asset Management Company) अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचा नातेवाईक १५ लाखांहून अधिक व्यवहार करत असेल, तर कंपनीला ही माहिती अनुपालन अधिकाऱ्यांना (Compliance Officer) कळवावी लागेल. म्हणजेच आता व्यवहारांची अधिक पारदर्शकता राहील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती काही नामांकित प्रसार माध्यमांच्या आधारे आहे, याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
