Onion Import Duty News : उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. बांगलादेश ने कांदा शुल्क हटवले आहे. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असू शकते. पुढील दोन महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रसार माध्यमांमधून सांगितले जात आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यापासून बांगलादेशमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आयात करण्यासाठी शुल्क लावले होते. त्यामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता. शिवाय बाजार भाव देखील अपेक्षित मिळत नव्हता. मात्र आता बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळांनी कांद्याच्या आयात वरील सीमा शुल्क आणि नियमक शुल्क पूर्ण पणे मागे घेतले आहे. स्वयंपाक घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाच सांगितण्यात येत आहे. Onion Import Duty News
याबाबत सविस्तर माहिती NBI चे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल रहमान खान यांनी बुधवारी याबाबत दिली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र देखील जारी केलेले आहे. 15 जानेवारी 2025 पर्यंत हे आयात शुल्क मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी बांगलादेश येथील व्यापार आणि शुल्क आयोगाने कांद्याचे किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या पाच टक्के सीमा शुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आले असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भारतातील व्यापाऱ्यांना कांद्याची निर्यात थेट बांगलादेशमध्ये करता येणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येणार
बांगलादेशमध्ये आयात शुल्क हटवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार अशी अशा देखील व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेश आता भारतातून अधिक कांदा आयात करण्यास सुरुवात करेल. परिणामी कांद्याला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांना देखील होण्याची शक्यता आहे.