Onion Market | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून कांद्याच्या दर दबावत होते मध्यंतरी कांद्यावरची निर्यात बंदी हटणार या बातमीने कांद्याचे दर काही बाजारामध्ये वाढले होते परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे ती म्हणजे कांदा दरामध्ये मोठी घसरण झाले ते चित्र दिसत आहे. Onion Market
खरे तर कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घेतले जाते. हा कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील लागवड केली जाते. सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये घेतली जाते इथे कांद्याचे मोठे मार्केट यार्ड देखील आहेत.
Also Read This | शेती विषयक बातमी व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी किती क्लिक करा
महाराष्ट्राचा कांदा उत्पादन बाबतीत मोठा सिंहाचा वाटा आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने पांढरा कांदा व काही भागांमध्ये लाल कांदा लागवड केली जाते. तसेच राज्यामध्ये तिन्ही हंगामामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात.
तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा हा नाशिक जिल्ह्यामध्ये घेतला जाते. मध्यंतरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. शेतकऱ्यांनी केलेले अतोनात कष्ट व बळीराजा आणि केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठे अडचणी सापडलेला आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी कांदा निर्यात बंदी घातल्यामुळे कांद्याचे भाव मातीमोल झाले होते.
ही बंदी केंद्र सरकारने 31 मार्च पर्यंत घातली होती. या निर्णयानंतर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली व शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये चक्क पाणी आले. अजून देखील बाजारामध्ये कुठेही सुधारणा पाहायला मिळाली नाही मध्यंतरी काही अशा बातम्यामुळे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली होती. परंतु हे फक्त बातम्याच होत्या पुन्हा एकदा दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरत मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून झालेल्या लिलावामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये काही बाजारात 500 रुपये इतकी घसरण झाल्याने शेतकरी पूर्ण बेजार झालेला आहे. तसेच शेती करत असताना खते बियाणे रोपे लागवड काढणी मजुरी हे दर देखील गगनाला भिडलेले आहेत. अशातच शेती पिकला योग्य दर मिळत नसल्याने व शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा पीक परवडत नसल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर १७५१ रुपये प्रति क्विंटल इतके होते परंतु. गुरुवारी झालेल्या लोहा मध्ये कांद्याचे दर पाचशे रुपयांनी घसरण झाली. तसेच उन्हाळी कांद्याला 1 हजार 175 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे. घसरणीमुळे शेतकरी पूर्ण हातबल झालेला आहे व शेती कसा करायची असा प्रश्न शेतकरी वर्ग मधन व्यक्त होत आहे.