pm gharkul yojana :- घरकुल योजना एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या मार्फत नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतु अनेक वेळा असे होते की तुम्ही तुमचा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये दाखल करता परंतु यादीमध्ये तुमचे नाव येत नाही. अनेक ठिकाणी अशी होती की ज्याला गरज आहे त्याची नावे घरकुल यादी येत नाही व श्रीमंत व्यक्तींची नावे घरकुल यादी देतात, काही ठिकाणी सरपंच किंवा सचिव यादीतून नाव वगळले अशी देखील तक्रार येत आहे यामुळे आता सरकारने एक नवीन मोहीम राबवली आहे.pm gharkul yojana
हे पण वाचा :- घरकुल योजनेला ऑनलाईन प्रकारे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आता या सर्व प्रश्नावर तोडगा काढत सरकारने घरकुल योजनेसाठी आवाज प्लस 2024 हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकता व आपल्या हक्काचे घरकुल मिळू शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील पाच वर्षांमध्ये 2 कोटी घर बांधण्यासाठी सन 24-25 ते 2028-29 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा राबवणीची घोषणा सरकारने केली आहे.
हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा!
2018 मध्ये झालेल्या घरकुलच्या सर्वेक्षणासंदर्भात मोठ्या तक्रारी समोर आल्या होत्या प्रतीक्षा यादी समाविष्ट न झालेल्या किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने आता ही नवीन प्रक्रिया राबवली आहे. यापुढे आता ज्या नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही व ज्या नागरिकाचे कच्चे घर आहेत या नागरिकांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
या तारखेपासून होणार अर्ज प्रक्रियेला सुरुवात :-
नवीन घरकुल योजनेला 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली असून, तुम्ही या योजनेला अर्ज करण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन आवास प्लस 2024 या ॲपच्या साह्याने अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अधिक उत्तम नागरिकांनी घ्यावा व आपल्या घर पक्क करावे अशी आव्हान देखील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखळेकर यांनी नागरिकांना केले आहे.
हे पण वाचा :- आवास प्लस 2024 ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तुमच्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी हा घरकुलचा सर्वेक्षक राहणार आहे. जर तुम्हाला योजना अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कडून देखील अर्ज करून घ्यायचा आहे. मात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकांना घरकुलचा लाभ मिळणार आहे असे देखील विस्तार अधिकारी यांनी सांगितले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
आम्हाला पण लाभ पाहिजे पण आमचा पर्यंत येत च नाही ही योजना