Pm Kisan Yojana | देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील पीएम किसन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण केंद्र सरकार अंतर्गत 2019 मध्ये एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली ती म्हणजे पीएम किसान योजना या योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात दोन हजार रुपयांचा हप्ता हा वर्षातून प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये विभाजन केले जाते. Pm Kisan Yojana
ते चार महिन्याच्या अंतरावरती शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. खरंतर आता या योजनेच्या लाभार्थ्यांना 21 व्या हप्ता कधी मिळणार आतापर्यंत 20 हप्ते मिळाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे खरच शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार का एकदा जाणून घ्या.
केंद्र सरकारने मध्यंतरी काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 वा हप्ता जाहीर केलेला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी वाट पाहत आहेत की आम्हाला हे पैसे कधी मिळणार? कारण पंजाब, हिमाचल, प्रदेश जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या राज्यांमध्ये भुज्खलन पूर परिस्थिती यामुळे येथील शेतकऱ्यांना हप्ता देण्यात आला, तसेच परिस्थिती महाराष्ट्रात देखील झालेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार. याबाबत अशातच एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे.
कधी मिळणार शेतकऱ्यांना 21 व हप्ता
प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 वा हप्ता जमा केला जाणार आहे. कारण सात ऑक्टोबर 2025 रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हप्ता देण्यात आलेला आहे तसेच 21 व्या हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे बाकी राज्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
काही प्रसारमाध्यमांमध्ये हा हप्ता जानेवारी महिन्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु अद्याप कुठलाही शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही व अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा बातमींवरती विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणाची वाट पहावी.