गुड न्यूज! या तारखेला 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹2 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : भारत सरकार अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारे आणि अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. अशीच एक योजना भारत सरकार अंतर्गत राबविण्यात आलेली आहे. त्या योजनेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ती योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेच्या खात्यावरती 17 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या योजनेचा पुढचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत याची तारीख आणि वेळ आपण तपासून घेऊया. PM Kisan Yojana

भारत सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेचा अठरावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. याबाबत शासन स्तरावर ती कामकाज चालू आहे.

पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या संबंधित तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेले असून लवकरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहे. मुळे शेतकऱ्यांना ही मदत खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत आणि या काळात शेतकऱ्यांना जर ही रक्कम मिळाली तर नक्कीच त्यांना या हप्त्याचा दिलासा मिळणार आहे.

या तारखेला मिळणार 18 वा हप्ता

अधिकृत संकेतस्थळावरती दिलेल्या माहितीनुसार 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 हप्ते वर्ग करण्यात आलेल्या असून हा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढची आप्तेची ओढ लागली होती. हा हप्ता कधी जमा होणार याबाबत शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. हा हप्ता लवकरच आत काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.

पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा आता वाशीम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹20,000 कोटी रुपये जमा होणार आहेत.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करा पूर्ण

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ताह पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ई -KYC वेळ पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.

त्यामुळे शेतकरी ने लवकरात लवकर त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल वरती ॲप डाऊनलोड करून फेस ऑटोंटेशनद्वारे पी केवायसी करू शकता. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती मिळणार आहे.

तसेच तुम्ही आणखी काही पर्यायचा वापर करून केवायसी पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक प्रमाणिकरण द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्या.

Leave a Comment

x
error: Content is protected !!