Pm Kisan Yojana | देश भरातील शेतकऱ्यांनी अक्षरश डोळे लावून वाट पाहिलेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता अखेर आता शेतकऱ्यांच्या हाती येण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधीच थोडा दिलासा अनुभवला आहे. पण आता लक्ष आहे या वर्षातील तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे आपल्याकडे तो म्हणजे पी एम किसान चा २१ वा हप्ता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. Pm Kisan Yojana
या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच मिळाला 21 वा हप्ता !
सरकारने यावेळी काही निवडक राज्यामध्ये तातडीची मदत म्हणून 16 सप्टेंबर 2025 रोजी हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहे. या राज्यामध्ये अलीकडच्या पूर आणि दुष्काळणामुळे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
20 व्या हप्त्यात किती रक्कम झाली वितरित ?
2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका क्लिकवर तब्बल 97.1 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात 20500 कोटी रुपये जमा केले आहे यामधील बिहारमध्ये 7.5 लक्ष शेतकरी या निधीचा थेट लाभ घेत आहेत. केलं काही वर्षाच्या अनुभवावरून पाहिलं तर हा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. पण यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबरला येत असल्यामुळे बहुतांशी शेतकरी आशीर्वादी आहेत की सणासुदीपूर्वी खात्यात पैसे जमा होतील.
तुमचं PM Kisan अकाउंट अपडेट करा !
सरकारने स्पष्ट सुद्धा दिले आहेत की , तुमचा हप्ता वेळेवर हवा असेल तर आधार बँक खाते आणि जमीन द्यावे वेळोवेळी अपडेट असले पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी केवायसी किंवा आधार लिंक झाल्यामुळे पीएम किसान चे पैसे गमवले आहेत. त्यामुळे तुमच्या गावातील कॉमन सर्विस सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपली केवायसी पूर्ण करावी.
कधी मिळणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता !
अजून देखील याबाबतची कोणती अधिकृत तारीख घोषित झालेली नाही, सूत्रांचे माहितीनुसार योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये खात्यावर जमा होऊ शकतो. त्याचबरोबर हिमाचल पंजाब उत्तराखंड मध्ये या योजनेचा हप्ता आधीच शेतकऱ्यांना दिला आहे.
PM Kisan योजनेचे मूळ उद्देश काय ?
पी एम किसान सन्माननिधी योजना ही फक्त एक पेमेंट स्कीम नाहीतर लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक ऑक्सिजन देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यामध्ये वितरित केले जाते. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाते.