पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना, पाच वर्षे दर महिन्याला मिळतील 20,500 रुपये, वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme in Marathi | गुंतवणूक करण्याचा विचार करताय? कुठे करावी कळत नाही, तर चिंता नको अशीच एक बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता. खरंतर आज प्रत्येकाला निवृत्तीच्या नंतर आयुष्याची काळजी सतावते. नोकरी थांबली की घर खर्च, दवाखाना खर्च,  दैनंदिन गरजा कशा भागवायचा असा सर्वात मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. परंतु आता सरकारने चालू केलेल्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेमुळे ही काळजी थोडीशी कमी होणार आहे. Post Office Scheme in Marathi

या योजनेत गुंतवणूक केले तर तुम्हाला दर महिन्याला तब्बल 20,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे म्हातारपणात पगारासारखे ठराविक उत्पन्न मिळणार आणि निवृत्तीच आयुष अगदी बिंदासपणे घालवता येणार आहे. ही योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). साठ वर्षावरील लोकांसाठी सरकारने खास ही योजना बनवली आहे.

यामध्ये 8.2 टक्के व्याज मिळतं. समजा एखाद्याने तीस लाख रुपये गुंतवले तर त्याला वर्षभरात 2.46 लाख रुपयांचे व्याज मिळतं. म्हणजे दरमहा सरळ 20,500 रुपये खात्यात जमा होतात. ही रकम तुमच्या पेन्शन सारखीच काम करते. निवृत्तीनंतर उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात, अशावेळी अशा योजनेतून मिळणारे पैसे खूप महत्त्वाचे असतात. पूर्वी या योजनेत 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येत होती, पण आता ती मर्यादा वाढून तीस लाख रुपयांपर्यंत नेली आहे.म्हणजे गुंतवणूक दुप्पट आणि व्याजही दुप्पट.

योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना पूर्णपणे सरकारी आहे, त्यामुळे कुठलाही बाजारातील धोका नाही. देशभरातील लाखो निवृत्त नागरिक या योजनेवर विश्वास ठेवून आहेत. पाच वर्षासाठी ही योजना असली तरी हवी असल्यास ते आणखी तीन वर्षांनी वाढवता येते. गरज पडल्यास मुद्दल काढता येते पण त्यावर थोडा दंड आकारला जातो. खात उघडणं फार सोप आहे.

त्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो दिला की लगेच खात उघडतं. मात्र लक्षात ठेवा, मुद्दल सुरक्षित असलं तरी व्याजवर कर भरावा लागतो. पण एकंदरीत बघता ही योजना म्हातारपणी पोटपाण्याची मोठी सोयी ठरते. सरकारचे या योजनेमुळे स्वतःच्या पैशावर स्वतःचा संसार सांभाळता येतो. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करावी त्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घ्यावी हवी असेल तर लगेच गुंतवणूक करावी.

( Disclaimer: ही माहिती केवळ माहिती करिता आहे आम्ही गुंतवणुकी बाबत कुठलाही सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | Post Office Scheme: महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना देतील जबरदस्त नफा; जाणून घ्या सविस्तर..

Leave a Comment