पंजाबराव यांची मोठी माहिती, या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस घेणार विश्रांती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेल्या राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी माहिती दिलेली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढणार का याचा शेतकऱ्यांना होणारा पण सविस्तर माहिती जाणून घेऊ. Panjab Dakh News

शेती विषयक माहिती हवामान अंदाज घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना चांगला दणका दिलेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केलेले आहे. आणि काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पीक खराब झालेले आहेत. तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

काही ठिकाणी सोयाबीन उडीद मूग यासारखी पिक अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्या पिकाची काही दिवसात हार्वेस्टिंग देखील सुरू होणार आहे. याच दरम्यान पावसाने मोठा फटका बसलेला आहे या मुळे शेतकऱ्यांन मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर पंजाबराव यांनी महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार व कोणत्या तारखेपासून पाऊस विश्रांती घेणाऱ्या बाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

राज्याचे जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या काळात पाऊस विश्रांती घेणार आहे. तसेच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या ठिकाणी 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पासून अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अमरावती हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजी नगर जळगाव या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच पंजाबराव यांनी दहा तारखे नंतर पाऊस गायब होणार असल्याचे सांगितले आहे तसेच महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र मध्ये सांगली सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे 14 सप्टेंबर नंतर ही पावसाची विश्रांती पहिला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे सोयाबीन उडीद मूग यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग करायला देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1 thought on “पंजाबराव यांची मोठी माहिती, या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस घेणार विश्रांती”

Leave a Comment

error: Content is protected !!