Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Recruitment: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेमध्ये कोणत्याही लेखी परीक्षा शिवाय थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आहे. ही भरती स्पोर्ट कोटा (Sports Quota) अंतर्गत घेतली जाणार आहे. त्यामुळे ही नोकरी मिळवण्यासाठी देशासाठी खेळलेले किंवा क्रीडा क्षेत्रात नाव कमवलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवार आता थेट रेल्वे मध्ये अधिकारी होऊ शकतात.

रेल्वेत भरती जाहीर

साऊथर्न रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांनी या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाईट वर भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 67 पदे भरण्यात येणार आहेत. ही पद लेवल वन ते लेवल पाच पर्यंत असणार आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर या भरती अंतर्गत गव्हर्मेंट नोकरी मिळू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 12 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच आपला अर्ज सबमिट करा. शेवट शेवट वेबसाईटवर तांत्रिक अडचणीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. Railway Recruitment

पात्रता निकष

या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.

  • लेवल 2 आणि लेवल 3 पदासाठी: उमेदवारांनी कॉमनवेल्थ गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, युथ गेम्स किंवा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असावे.
  • लेवल 1 पदासाठी: उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळ खेळलेला असावा.
  • वयोमर्यादा: 18 ते 25 वया दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षा शिवाय उमेदवारांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी दिली जाणार आहे. उमेदवाराची निवड स्पोर्ट्स ट्रायल कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी द्वारे केले जाणार आहे. म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थाने एक चांगली खेळाडू असाल तर तुम्हाला थेट सरकारी नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे.

वेतन व सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे सेवेमध्ये सामील झाल्यानंतर 12000 ते 29 हजार 200 रुपये बेसिक सॅलरी दिले जाणार आहे. याशिवाय डी ए एच आर ए प्रवास भत्ता मेडिकल सुविधा आणि इतर सरकारी कर्मचारी लाभ देखील या उमेदवारांना दिले जाणार आहेत.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. अर्ज कसा करावा जाणून घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • या वेबसाईटवरील sports quota recruitment 2025 या पर्यावर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म नीट अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

भारतासाठी खेळलेले अनेक तरुण आपल्या करिअरमध्ये नोकरीच्या शोधात असतात. अशावेळी रेल्वे सारख्या सरकारी संस्थेत थेट नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी खऱ्या अर्थाने त्यांच्या खेळीला प्रोत्साहन देण्याचे काम आहे. सरकारी नोकरी स्थिर उत्पन्न आणि कुटुंबाचा आर्थिक आधार या सर्व गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात. खेळाडूंनी या भरतीसाठी अर्ज करण्यास अजिबात वेळ वाया लावू नये. कारण सरकारी नोकरी मिळवण्याची अशी संधी रोज निर्माण होत नाही. 12 ऑक्टोबर 2025 ही जरी शेवटची तारीख असली तरी वेळ आधी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!