Rain alert today : नमस्कार मित्रांनो हवामान विभागाने राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाने जोरदार आगमन केले आहे, गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड पर्यंत सामान्य जनतेला अनेक अडचणी आले आहेत. आता हवामान विभागाने, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडच कोकणातील अनेक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे चिंता वाढली आहे. Rain alert today
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
मुंबईमध्ये वर्तवला मुसळधार पावसाचा अंदाज !
आज वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरांमध्ये दिवसभर हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परंतु अनेक भागात जोरदार पावसाचा फटका देखील बसणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे अधून मधून पावसाच्या सरी देखील बरसणार आहे . कमल तापमान हे सुमारे 30° c असणार आहे तर किमान तापमान हे 25°c राहणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 की मी पर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवले आहे. ठाणे नवी मुंबई रायगड, या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.
हे पण वाचा | या भागामध्ये पाऊस थांबायचं नाव घेईना! परंतु मराठवाड्यातील शेतकरी अजून पावसाच्या प्रतीक्षेत
अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेनच्या वेळ मध्ये देखील बदल होऊ शकतो. रस्त्यावर पाणी साठल्याने ट्राफिक वाढू शकते नागरिकांनी शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे, किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट !
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता किती काही जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भरतीच्या काळामध्ये समुद्र खवळले राहील त्यामुळे मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी.
यानंतर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात कडे देखील धोका वाढलेला आहे नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे . नद्याची पाणी पातळी वाढली असून सकल भागात पाणी साचल्याचा धोका निर्माण झाला आहे गुजरातच्या नवसारी वलसाड तर मध्य प्रदेशच्या धार इंदूर सारख्या जिल्ह्यातील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.