Rain Update | महाराष्ट्र मध्ये सध्या पावसाने मोठा हाहाकार माजवलेला आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झालेल आहे. अशातच मराठवाड्यातील काही भागात परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, आपत्कालीन गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका असा स्पष्ट इशारा दिला आहे. Rain Update
या पार्श्वभूमी वरती राज्यातील पालघर, रायगड, नाशिक, ठाणे, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागांनी आज थेट रेड अलर्ट दिलेला आहे. म्हणजे या भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. तर सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आधीच घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली असून, दरम्यान मधून विसर्ग वाढवावा लागलाय. पुण्यातील खडसवासला धरणातून रात्री हजारो क्युसेस पाणी सोडण्यात आलं. यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे.
तसेच रायगड जिल्हा प्रशासना नागरिकांना इशारा दिला की, अतिवृष्टी झाल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. किनरालगत राहणाऱ्यांनी, मच्छीमारांनी आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, जुन्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी सतर्क राहावं, असा आव्हानही प्रशासनाकडून करण्यात आल आहे. नागरिकांनी अफवा न पसरवता फक्त प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवावा, असं आवर्जून सांगण्यात आल आहे.
मराठवाड्यामध्ये परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली असून, NDRF चे पथक तैनात करण्यात आले आहेत. सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये NDRF च तातडीचं काम सुरू आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्या आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये NDRF ला हाय अलर्ट देण्यात आला. प्रशासनाचा प्रयत्न आहे की नागरिकांना वाचवणं आणि आवश्यक ठिकाणी मदत पोहोचवणे हे काम प्रथम प्राधान्य व्हावा.
सध्या परिस्थिती राज्यांमध्ये अधिकच गंभीर होत चाललेला आहे बाहेर रात्रभर पाऊस कोसळत आहे नद्यांची पातळी वाढत चाललेली आहे. या सगळ्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे तरी शासनाने पष्ट सांगितला आहे की परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी सगळे उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी केवळ काळजी घेऊन घरात सुरक्षित राहावं. गरज असेल तरच घरा बाहेर पडा नाहीतर पुढची काही दिवस घरातच थांबा.
हे पण वाचा | या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; नवीन हवामान अंदाज