RD interest rate in India | सध्या देशातल्या बहुतांश बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिट (FD) योजनेचे व्याजदर कमी केले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, युनियन बँक अशा मोठ्या बँकांनी आता एफडीवरील मिळकत घटवली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा ओघ पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेकडे वळला आहे. RD interest rate in India
हे पण वाचा | फक्त व्याजातून ८२,००० रुपये! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ज्येष्ठांसाठी आहे सुवर्णसंधी!
याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसच्या ‘आरडी योजना’ म्हणजेच Recurring Deposit Scheme सध्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. कारण दरमहा थोडीशी रक्कम गुंतवून पाच वर्षांनंतर लाखो रुपये मिळवण्याचा हा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.
काय आहे पोस्टाची RD योजना?
ही योजना पाच वर्षांची म्हणजे 60 महिन्यांची आहे. यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला ठराविक रक्कम भरतात आणि त्यावर त्यांना सध्या 6.7% वार्षिक व्याज दर मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही व्याजदर केंद्र सरकारकडून ठरवले जातात आणि दर तीन महिन्यांनी त्यावर आढावा घेतला जातो.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! तुम्हाला मिळणार 8 लाख रुपये? जाणून घ्या सविस्तर
अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना एकरकमी मोठी गुंतवणूक करणं शक्य होत नाही. पोस्ट ऑफिसची ही आरडी योजना त्यांच्या साठी नियमित बचतीचा विश्वासार्ह पर्याय बनतो. यात तुम्ही दरमहा हप्ता भरत राहताच आणि शेवटी एक मोठा रक्कम तुमच्या हाती येतो.
कर्ज सुविधा देखील उपलब्ध!
या योजनेची आणखी एक खासियत म्हणजे या योजनेवर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकतं. जर तुम्ही किमान 12 महिने आरडी भरली असेल, तर जमा रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते. मात्र हे लक्षात घ्या की कर्जावरील व्याज हा आरडीवरील व्याजापेक्षा 2% जास्त असतो. म्हणजे सध्या जर आरडीवर 6.7% व्याज मिळत असेल, तर कर्जावर 8.7% व्याज लागू होईल.
7 लाखांचे रिटर्न मिळवायचे? तर हे लक्षात ठेवा
उदाहरणच घ्या जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला फक्त 10,000 रुपये गुंतवले, तर 60 महिन्यांनंतर त्याच्या हाती सुमारे 7 लाख 13 हजार 659 रुपये येतात. यामध्ये 6 लाख रुपये मूळ गुंतवणूक राहते आणि उर्वरित 1.13 लाख रुपये हे निव्वळ व्याजरूपात मिळतात. एवढं काही जोखीम न घेता, सरकारी हमी असलेल्या योजनेत मिळणं ही आजच्या काळात मोठी बाब आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिस ची लखपती बनवणारी योजना! या योजनेत दररोज 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये
पोस्टाची आरडी योजना विश्वासाचा पर्याय
ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. सरकारी योजना असल्यामुळे या योजनेत फसवणुकीचा किंवा जोखमीचा काहीच धोका नाही. शिवाय, बँकांपेक्षा या योजनेत व्याजदर अनेकदा अधिक स्थिर आणि आकर्षक असतो.
बँकांचे व्याजदर घसरत असताना जर तुम्हाला तुमच्या कष्टाच्या पैशावर ठरलेला आणि सुरक्षित परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची आरडी योजना ही एक सुवर्णसंधी आहे. दरमहा थोडीशी शिस्त लावा, आणि पाच वर्षांनी तुमच्या हातात लाखोंचा निधी तयार होईल. फक्त योजना जाणून घ्या आणि त्याचा फायदा वेळेत घ्या!
Disclaimer:
ही माहिती विविध अधिकृत शासकीय संकेतस्थळे आणि वित्तीय स्त्रोतांवर आधारित आहे. व्याजदर व अटी वेगवेगळ्या काळात बदलू शकतात. योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपशीलवार माहिती घ्यावी. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना स्वतःचा विचार व सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.