Silver Rate Today: दिवाळीनिमित्त सोन्या–चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या किमतीत होत असणारी वाट पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र दिवाळीपूर्वीच चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण पाहून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही आठवड्यापासून सोन्यासोबत चांदीचे दर देखील गगनाला भिडत होते. चांदीचे दर किलोमागे तब्बल दोन लाखाच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे दागिने खरेदी करणे अवघड झाले होते. मात्र आजच्या बाजारात अचानक चांदीच्या किमतीत झालेली घसरण पाहून सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
आजच्या ताज्या अपडेट नुसार, चांदीच्या दरात तब्बल 4000 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 1,85,000 रुपये एवढा नोंदवला गेला आहे. दहा ग्रॅम चांदीचा दर 1850 रुपये तर 100 ग्रॅम चांदीचा दर 18500 रुपये एवढा आहे. एकंदरीत कालच्या तुलनेत आज चांदीचा बाजार भाव घसरला आहे. ही घसरण अनेक ग्राहकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. कारण मागच्या महिन्याभरात चांदीच्या भावात ज्याप्रकारे वाढ झाली होती त्यामुळे अनेकांनी खरेदी करणे पुढे ढकलले होते. आता दर कमी झाल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. Silver Rate Today
मागच्या दहा महिन्यात किती दर बदलले?
चांदीच्या भावामध्ये मागील 10 महिन्यांमध्ये अक्षरशा दुप्पट बदल झाला आहे. एक लाखाच्या घरात असणारा दर आता दोन लाखाच्या घरात गेला आहे. प्रत्येक दिवशी दोन-तीन हजार रुपयांनी चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी चांदी खरेदी करणे टाळले होते. दिवाळीनिमित्त चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी सुखद वाटणारी आहे. भारतीय संस्कृतीत चांदीला शुभ दागिना मानल जाते. विशेषता दिवाळीच्या दिवसात चांदीची नाणी भांडी किंवा दागिने घेणे ही आपली परंपरा आहे. मात्र चांदीच्या वाढत्या दरामुळे अनेकांनी खरेदी टाळले होते. आता दरात घसरण पाहून अनेक जण पुन्हा एकदा बाजारात खरेदीसाठी जात आहेत. जर आणखीन थोडे घसरले तर खरेदी करणे सोपे होईल असे देखील अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे.
आज चांदीच्या किमतीत घसरण झाले असली तरी सोन्याची किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात प्रती तोळा तब्बल 3300 ची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा दर एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति गोळा एवढा झाला आहे. त्यामुळे चांदी थोडी स्वस्त झाली असली तरी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच चांदीच्या दारात झालेली ही घसरण बाजारासाठी आणि ग्राहकांसाठी शुभ मानली जात आहे. सोन्या चांदीच्या किमतीतील चढ-उतार सणासुदीच्या काळात नेहमीच चर्चेचा विषय बनत आहे. पण या दिवाळीत जर तुमचं लक्ष चांदीच्या वस्तू खरेदी करण्यावर असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.