SIP Calculator : आजच्या काळामध्ये श्रीमंत होण्यासाठी मोठी कमाई असणं खूप आवश्यक नाही, तर योग्य दिशा आणि सातत्य असणं गरजेचं आहे. लोकांना वाटतं की अरे आता माझ्याकडून काय गुंतवणूक होणार, माझं उत्पन्नच फार कमी आहे. परंतु जर तुम्ही देखील स्वप्न श्रीमंत होण्याचे पाहत असाल, तर तुमच्यासाठी अशीच एक माहिती आम्ही घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही श्रीमंतीच्या दिशेने एक छोटासा पाऊल टाकणार आहात म्हणजे Systematic Investment Plan.
आता कल्पना करा जर तुम्ही दर महिन्याला फक्त ₹100 SIP मध्ये गुंतवणूक केली, तर तेवढ्याशा रकमेतून तुम्ही भविष्यामध्ये दहा लाख रुपयांचा फंड तयार करू शकता! परंतु हे खर आहे का? का फक्त ऐकायला बरं वाटतंय! हो खर आहे कारण यामागे काम करतं कंपाऊंड जादू म्हणजे व्याजावर व्याज वाढवण्याची ताकद. SIP Calculator
₹100 ची SIP किती वाढेल?
जर तुम्ही दर महिन्याला 100 रुपये SIP मध्ये गुंतवले आणि त्यावर 12% वार्षिक परतावा (Return) मिळाला, तर 25 वर्षांमध्ये ही छोटी रक्कम वाढवून जवळपास ₹1.70 लाख होईल! यामध्ये फक्त ₹30,000 मूळ गुंतवणूक आणि बाकीचं ₹1.40 लाख व्याजातून मिळालेल्या नफा असेल. म्हणजेच रोज एक कप चहा कमी पिऊन तुम्ही आवश्यक पुढे जाऊ शकता! हेच कंपाऊंडिंग चा जादू जितका जास्त वेळ, तितका पैसा वाढत जातो.
₹10 लाख कधी बनतील?
आता थोडं विचारूया तर तुम्ही शंभर रुपयांची बचत केली SIP 47 वर्षे चालू ठेवली आणि 12% परतावा मिळाला, तर तुमचा फंड सुमारे ₹10 लाखांपर्यंत पोहोचले. पण जर तुम्ही दरवर्षी SIP ची रक्कम 10% ने वाढवली, म्हणजेच पुढच्या वर्षी ₹110, त्यानंतर ₹121 अशी हळूहळू वाढ केली, तर 33 वर्षातच तुम्ही ₹10 लाखांचा फंड तयार करू शकता! हो, इतकच नाही, जर बाजारांचा परफॉर्मन्स थोडा चांगला राहिला, तर हा फंड ₹12 – ₹15 लाखांपर्यंत वाढू शकतो.
म्हणजे गुंतवणूक सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे वेळ जितका तेवढा जास्त पैसा गुंतवलेला राहतो, तितकीच त्याची वाट जलद होते. म्हणूनच एस आय पी ला शिस्तबद्ध बचतीचा मार्ग असं म्हणतात. सुरुवात लहान असली तरी सातत्य ठेवलं, तर एक दिवस तिची SIP मोठ्या संपत्तीत बदलते.
जर तुम्ही आजपासून शंभर रुपये गुंतवणूक सुरुवात केली तर पुढच्या 30 वर्षात हळूहळू रक्कम ती पाचशे रुपये केली तर तुम्ही दहा लाख रुपये नाहीतर 25 ते 30 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता! म्हणजे एका छोट्याशा सवयीने तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकत.