Soyabean Rate Today | खुल्या बाजारात सोयाबीनचे दर दिवसान दिवस खाली घसरत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हिरमोड झाला असला तरी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. नाफेडणे शेतकऱ्यांसाठी सरकारी हमीभाव सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे . आणि खास गोष्ट म्हणजे ही नोंदणी आता तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे सहज करता येणार आहे.
अनेकदा बाजारात व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून माल घेतात. पण नाफेड कडून शेतकऱ्यांचा माल हमीभावात घेतला जातो त्यामुळे हंगामात जास्त दर मिळवण्यासाठी ही संधी गमवू नका. खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलद्वारे ई समृद्धी या ॲप वर नोंदणी करा.
या सोप्या पद्धतीने करा नोंदणी :
- ई समृद्धी ॲप डाऊनलोड करा
सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ही समृद्धी हे ॲप डाऊनलोड करा डाऊनलोड झाल्यावर ॲप उघडा.
- मोबाईल नंबर लॉगिन
आपला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाकून ॲप मध्ये लॉग इन करा . - आधार कार्ड तपशील योग्य भरा
पूर्ण नाव आणि आधार क्रमांक लिहा आणि फेस ऍथॉरिटी केशन करा त्यानंतर तुमची माहिती आपोआप भरली जाणार आहे.
- वैयक्तिक माहिती आणि पत्ता भरा
शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा यास अल्पभूधारक असल्यास त्यांची माहिती भरा प्रवर्ग वडिलांचे नाव आणि आधार कार्ड चा फोटो अपलोड करा.
- बँक डिटेल भरा
अकाउंट होल्डर चे नाव, बँकेचा IFSC कोडल्या आणि पासबुकचा फोटो अपलोड करा.
- सोयाबीन योजना निवडा
सोयाबीन साठीची योजना निवडा, ही सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे.
- सातबारा दस्ताऐवज अपलोड करा
जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर आणि खाता क्रमांक भरून सातबारा अपलोड करून घ्या.
नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर यशस्वी नोंदणीचा पॉप अप दिसेल आणि त्यांच्यासोबत SMS देखील येईल. शेतकरी मित्रांनो खुल्या बाजारात दर कमी असेल तर सरकारने दिलेल्या हा हमीभावा तुमच्यासाठी मोठा आधार थांबणार आहे. त्यामुळे विलंब न करता आजच ई-समृद्धी आपण नोंदणी करा आणि आपल्या मेहनतीच्या सोयाबीनला योग्य दर द्या.
