Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीन बाजारभावात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर घसरल्यानंतर आज सोयाबीन बाजारभाव सुधारणा झाली आहे. लातूर उमरखेड अकोला आणि जालना या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाले असून पिवळ्या सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे. एकूण 26775 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक दर उमरखेड बाजारात नोंदवला गेला आहे. या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला तब्बल 4600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होताना पाहून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.
राज्यात सोयाबीनची आवक आणि दर
राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्याचबरोबर आज सोयाबीनला 3000 ते 4400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला आहे. बीडमध्ये सर्वात कमी दर 2400 तर उमरखेड मध्ये सर्वाधिक दर 4600 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. त्याचबरोबर सरासरी दर 3866 रुपये प्रति क्विंटल एवढा नोंदवला गेला आहे. पिवळ्या सोयाबीनचे आवक जास्त असून या जातीला सर्वात जास्त मागणी देखील मिळत असल्याचे दिसत आहे. सध्या लातूर अकोला जालना उमरखेड अमरावती आणि हिंगणघाट या बाजारामध्ये व्यापाऱ्यांची चांगलीच हालचाल सुरू आहे.
प्रमुख बाजारातील स्थिती
- लातूर: लातूर बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी मिळाली आहे. या ठिकाणी दर 4000 ते 4550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत. लातूर बाजारात सोयाबीनची चांगली अवक होत असून भाव देखील टिकून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
- जालना: राज्यात सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना बाजार समितीमध्ये झाली आहे. या ठिकाणी तब्बल 20,304 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीनच्या बाजारात मात्र थोडा चढउतार दाखवत आहे. या ठिकाणी 2800 ते 4351 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला आहे. सरासरी दर 3811 रुपये एवढा होत आहे.
- अमरावती: अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनला 3800 ते 4121 रुपये दर मिळाला आहे. सरासरी दर 3960 एवढा असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत आहे. Soybean Bajar Bhav
- अकोला: अकोला येथे पिवळ्या सोयाबीनला 3800 ते 4305 रुपये दरम्यान दर मिळाला आहे. सरासरी दर चार हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. व्यापाऱ्यांच्या मते आगामी दिवसात सोयाबीनचे दर आणखीन वाढू शकतात.
- उमरखेड: आजचा सर्वात चर्चेत असलेला बाजार म्हणजे उमरखेड. येथे पिवळ्या सोयाबीनला सर्वात जास्त भाव नोंदवला गेला आहे. 4600 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली आहे. या ठिकाणी सरासरी दर 4550 रुपये एवढा मिळाला आहे. उमरखेड मध्ये मिळालेला उच्चांक दर पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
- हिंगणघाट: हिंगणघाट बाजार समितीमध्ये 3400 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. या ठिकाणी सरासरी दर 3800 रुपये प्रति क्विंटल आहे. येथील शेतकऱ्यांनी सांगितले की गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळेस दर चांगला मिळाला आहे.
- निलंगा आणि औराद शहाजानी: या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला सरासरी दर तीन हजार 934 ते 4000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते पिकाच्या गुणवत्तेनुसार भाव मिळत आहे.